जपान व इंडोनेशिया नौदल सहकार्य वाढविणार

नौदलटोकिओ – इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी बुधवारी जपानचा दौरा करुन पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये नौदल सहकार्यावर चर्चा झाली. तसेच पुढच्या महिन्यात जपानचे लष्कर पहिल्यांदाच इंडोनेशियाच्या ‘गरुडा शिल्ड’ सरावात सहभागी होणार आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांती व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी इंडोनेशियाचे सागरी सामर्थ्य मजबूत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी जपान इंडोनेशियाच्या नौदलाला सहाय्य करणार असल्याची घोषणा पंतप्रधान किशिदा यांनी केली. त्याचबरोबर इंडोनेशियातील पायाभूत सुविधा आणि आपत्ती निवारणासाठी जवळपास 32 कोटी डॉलर्सचे कर्ज देत असल्याचे जपानच्या पंतप्रधानांनी जाहीर केले. ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील आपल्या सागरी हद्दीत चीन अतिक्रमण करीत असल्याची तक्रार इंडोनेशियाने याआधी केली होती.

येत्या नोव्हेंबर महिन्यात इंडोनेशियामध्ये जी-20 देशांची बैठक होत आहे. जी-20मधील सदस्य देशांच्या नेत्यांना या बैठकीत सहभागी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष विडोडो अमेरिका, चीन, जपानला भेट देत आहेत.

leave a reply