चिनी राष्ट्राध्यक्षांच्या रशिया दौऱ्याचा रशिया-भारत संबंधांवर परिणाम होणार नाही

- रशियाच्या भारतातील राजदूतांची ग्वाही

नवी दिल्ली – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युक्रेनचे युद्ध सुरू असताना रशियाचा दौरा केला. हा दौरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय गाजला. यामुळे रशिया व चीन एकमेकांसोबत असल्याचे उघड झाल्याची चर्चा जगभरात सुरू झाली होती. अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांनी रशियाला चीनकडून मिळत असलेल्या पाठिंब्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी चीन व रशियाचे हे सहकार्य रशियाच्या भारताबरोबरील धोरणात्मक संबंधांवर परिणाम करणारे ठरेल, अशी चिंता काही विश्लेषकांनी व्यक्त केली होती. यासंदर्भातील दाव्यांना रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी उत्तर दिले.

चिनी राष्ट्राध्यक्षांच्या रशिया दौऱ्याचा रशिया-भारत संबंधांवर परिणाम होणार नाही - रशियाच्या भारतातील राजदूतांची ग्वाहीचीनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाचा दौरा केल्यामुळे, रशिया व भारतामधील धोरणात्मक सहकार्य बाधित होईल, असा विचार करणे म्हणजे काहीजणांचा भाबडा आशावाद ठरतो. कारण तसे होऊच शकत नाही, असा टोला रशियन राजदूतांनी लगावला आहे. सोशल मीडियावर राजदूत अलिपोव्ह यांनी आपले म्हणणे मांडले. युक्रेनच्या युद्धात भारताने रशियाच्या विरोधात व पाश्चिमात्य देशांच्या बाजूने भूमिका स्वीकारावी, यासाठी अमेरिका व पाश्चिमात्य देशांची धडपड सुरू होती. रशिया हा चीनचा सहकारी देश आहे, याकडे हे पाश्चिमात्य देश लक्ष वेधत होते. तरीही भारताने रशियाच्या विरोधात जाण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

त्या पार्श्वभूमीवर, चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या रशिया दौऱ्यामुळे रशियाचे भारताबरोबरील धोरणात्मक सहकार्य बाधित होईल, हा काहीजणांचा आशावाद ठरतो, असे सांगून रशियन राजदूतांनी पाश्चिमात्य तसेच पाश्चिमात्यांची तळी उचलून धरणाऱ्यांना लक्ष्य केले. काहीही झाले तरी भारत हा रशियाचा सर्वात महत्त्वाचा मित्रदेश असेल, अशी ग्वाही रशियाच्या नेतृत्त्वाने अनेकवार दिली होती. चीनबरोबरील रशियाच्या सहकार्याचा भारताबरोबरील रशियाच्या मैत्रिपूर्ण संबंधांवर परिणाम होणार नाही, असेही रशियन नेत्यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्य व चीनच्या लष्करामध्ये तणाव निर्माण झालेला असताना, भारताला आवश्यक असलेल्या संरक्षणसाहित्याचा पुरवठा करण्याची तयारीही रशियाने दाखविली होती.

हिंदी English

 

leave a reply