युरोपिय महासंघाकडून युक्रेनला दोन अब्ज युरोच्या संरक्षणसहाय्याची घोषणा

- स्लोव्हाकियाने ‘मिग-29’ युक्रेनमध्ये पाठवली

ब्रुसेल्स/किव्ह – युरोपिय महासंघाने युक्रेनला दोन अब्ज युरोच्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. यातील एक अब्ज युरो युक्रेनला तोफगोळे पुरविण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. तर उर्वरित निधी युरोपिय देशांनी युक्रेनला अधिकाधिक शस्त्रसामुग्री पाठवावी यासाठी देण्यात येणार आहे. युरोपिय देश संरक्षणसामुग्री व सहाय्य पुरवित असतानाही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांची मागणी लावून धरली आहे. विमाने व क्षेपणास्त्रे मिळाली नाहीत तर युद्ध लांबेल, असा इशाराही दिला आहे.

युरोपिय महासंघाकडून युक्रेनला दोन अब्ज युरोच्या संरक्षणसहाय्याची घोषणा - स्लोव्हाकियाने ‘मिग-29’ युक्रेनमध्ये पाठवलीअमेरिका व युरोपिय देशांनी गेल्या काही महिन्यात युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रसहाय्यात प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. मात्र ही वाढ कायम टिकणारी नसून पुढील काही महिन्यांमध्ये अमेरिका व युरोपिय देशांमध्येच शस्त्रसाठ्याची कमतरता निर्माण होईल, असे संकेत मिळाले आहेत. अमेरिका तसेच युरोपमधील शस्त्रनिर्मिती कारखाने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही युक्रेनच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोठा कालावधी लागेल, असे बजावले आहे.युरोपिय महासंघाकडून युक्रेनला दोन अब्ज युरोच्या संरक्षणसहाय्याची घोषणा - स्लोव्हाकियाने ‘मिग-29’ युक्रेनमध्ये पाठवली

या पार्श्वभूमीवर गुरुवारी युरोपिय महासंघाची बैठक झाली. बैठकीत युक्रेनसाठी दोन अब्ज युरोच्या संरक्षणसहाय्याला मान्यता देण्यात आली. यातील एक अब्ज युरो युक्रेनला तोफगोळे पुरविण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. युरोपिय महासंघाकडून युक्रेनला दोन अब्ज युरोच्या संरक्षणसहाय्याची घोषणा - स्लोव्हाकियाने ‘मिग-29’ युक्रेनमध्ये पाठवलीया निधीतून युक्रेनला जवळपास 10 लाख तोफगोळे दिले जातील, असे युरोपिय महासंघाने म्हटले आहे. तर उर्वरित एक अब्ज युरोचा निधी युक्रेनला इतर शस्त्रे पुरविण्यासाठी दिला जाईल. या निधीतून युरोपिय देश युक्रेनसाठी शस्त्रांची ऑर्डर देऊन ती शस्त्रे युक्रेनला देतील, असे महासंघाने सांगितले.

दरम्यान, स्लोव्हाकियाने चार मिग-29 लढाऊ विमाने युक्रेनला पाठविल्याची माहिती दिली आहे. स्लोव्हाकिया युक्रेनला 13 मिग-29 लढाऊ विमाने देणार आहे.

हिंदी English

 

leave a reply