रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यावर

- युक्रेन युद्धात रशियाला समर्थन देणाऱ्या ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेचे टीकास्त्र

ब्रासिलिया/वॉशिंग्टन – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह सोमवारी लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. सोमवारी त्यांनी ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासह परराष्ट्रमंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेतली. रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा सुरू असतानाच अमेरिकेने ब्राझिलला लक्ष्य केले. ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन मुद्यावर केलेल्या वक्तव्यावर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यावर - युक्रेन युद्धात रशियाला समर्थन देणाऱ्या ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेचे टीकास्त्रपरराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह आपल्या लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यात ब्राझिलसह व्हेनेझुएला, क्युबा व निकारागुआ या देशांना भेट देणार आहेत. सोमवारी ब्राझिलची राजधानी ब्रासिलियातून या दौऱ्याची सुरुवात झाली. रशिया-युक्रेन युद्धात ब्राझिलने युक्रेनला सहाय्य देण्याचे टाळले असून राजनैतिक पातळीवर रशियाला पाठिंबा दिला आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी शांतीचर्चा आवश्यक असल्याची भूमिका ब्राझिलने सातत्याने मांडली असून त्याचवेळी रशियाच्या हल्ल्यांवर टीका करण्याचे टाळले होते.

काही दिवसांपूर्वीच चीनचा दौरा करणाऱ्या ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेवर उघड टीकास्त्र सोडले होते. अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धाला अधिक प्रोत्साहन देणे टाळावे व शांती प्रस्थापित करण्याकडे लक्ष द्यावे असे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी बजावले होते. राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांची ही भूमिका रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उचलून धरली. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यावर - युक्रेन युद्धात रशियाला समर्थन देणाऱ्या ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेचे टीकास्त्रसध्याची स्थिती योग्य रितीने समजून घेतल्याबद्दल आम्ही ब्राझिलच्या नेतृत्त्वाचे आभारी आहोत, अशा शब्दात लॅव्हरोव्ह यांनी ब्राझिलची प्रशंसा केली.

ब्राझिलमध्ये झालेल्या विविध बैठकांमध्ये परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी रशिया व ब्राझिलमधील वाढत्या व्यापाराचा उल्लेख केला. दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2022 साली 10 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून ब्राझिलच्या स्थानाला आपले पूर्ण समर्थन असल्याचेही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रशिया व ब्राझिलमधील वाढत्या सहकार्याने अमेरिकेची अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे. ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन मुद्यावर केलेल्या वक्तव्यावर अमेरिकेने दिलेल्या प्रत्युत्तरातून ही अस्वस्थता दिसून आली. ब्राझिल हा रशिया व चीनच्या प्रचाराची पोपटपंची करीत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिली.

हिंदी English

 

leave a reply