पाश्चिमात्यांनी रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे जागतिक इंधन बाजारपेठेत मोठे बदल

माध्यमे व अभ्यासगटाचा दावा

global fuel marketमॉस्को – रशिया-युक्रेन संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे जागतिक इंधन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे वृत्त अमेरिकी माध्यमांनी दिले आहे. रशिया आता पाश्चिमात्य देशांऐवजी आशिया व इतर भागांमध्ये इंधनाची मोठ्या प्रमाणात निर्यात करीत असून यामुळे जागतिक व्यापाराची समीकरणे बदलतील, असे या वृत्तात सांगण्यात आले. तर ‘सेरा’ या अभ्यासगटाने पाश्चिमात्यांनी रशियावर टाकलेल्या ‘प्राईस कॅप’चे परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली असून रशियाला मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा दावा केला आहे.

global fuel market-1रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. यात जपान, ऑस्ट्रेलिया यासारखे देशही सहभागी झाले होते. जपान हा ‘जी7’ गटाचा भाग असून या गटाने रशियाच्या इंधन तसेच वित्त क्षेत्रावर निर्बंध टाकण्यासाठी पुढाकार घेतला होता. रशियन इंधनाच्या दरांवर नियंत्रण आणण्याचा प्रस्तावही ‘जी7’नेच पहिल्यांदा मंजूर केला
होता.

पाश्चिमात्यांच्या या निर्बंधांनंतर रशियाने आपले इंधन सवलतीच्या दरांमध्ये विकण्यास सुरुवात केली असून त्याचा फायदा आशियाई देशांची उचलला आहे. यात भारत व चीनसह इतर देशांचा समावेश असल्याचे ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात म्हटले आहे. हे दोन्ही देश रशियन इंधनाचे सर्वात मोठे आयातदार ठरले आहेत. त्याचवेळी जपानसारखा देश अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन आयात करीत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच 2022 सालातील पहिल्या 11 महिन्यांमध्ये दोन देशांमधील व्यापार तब्बल 18 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याची माहिती देण्यात आली होती.

युरोपमधील ‘सेरा’ या अभ्यासगटाने ‘प्राईस कॅप’ लागू झाल्यानंतर रशियन इंधनाचे दर 10 ते 15 डॉलर्स प्रति बॅरल घसरल्याचे सांगितले आहे. यामुळे रशियाला दररोज सुमारे 17 कोटी डॉलर्सचा फटका बसत असल्याचा दावा सेराने केला आहे.

हिंदी English

leave a reply