लोकशाही, युवाशक्ती व स्थैर्य यामुळे जग भारताकडे आशेने पाहत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – जागतिक पटलावर भारत चमकता तारा म्हणून समोर येत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. तर आंतराष्ट्रीय पातळीवरील उलथापालथींना सामोरे जाण्याची भारताची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक आहे, अशी ग्वाही जागतिक बँकेने दिली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुलभूत पाया भक्कम असल्यामुळे हे शक्य झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मध्यप्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2025’ला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधानांनी हा संदेश दिला.

Narendra-Modiया वित्तीय वर्षात भारतात येणारी थेट परकीय गुंतवणूक तब्बल 100 अब्ज डॉलर्सवर जाईल, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. युक्रेनचे युद्ध व इतर भू-राजकीय उलथापालथींमुळे जगभरातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडलेल्या असताना, भारत आश्वासक विकासदराने प्रगती करीत आहे. याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांवर पडला असून त्यामुळे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ पुढच्या काळात अधिकच वाढेल, असे दावे केले जातात. अशा परिस्थितीत भारता सरकार परदेशी गंतवणूक अधिकाधिक प्रमाणात आकर्षित करण्यासाठी पावले उचलत असून भारतीय नेते देशाने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रगतीचे सातत्याने दाखले देत आहेत.

‘ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2025’मध्ये बोलताना पंतप्रधानांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याचे सांगून त्यामुळे जगभरात फार मोठ्या उलथापालथी सुरू असताना देखील भारत आर्थिक विकास करीत असल्याचा दावा केला. भारताची भक्कम लोकशाही, जनसंख्येतील तरुणांची मोठी संख्या आणि राजकीय स्थैर्य यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था भारताबाबत हा आशावाद दाखवित आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. कोरोनासारखी शतकातून एकदाच समोर येणारी भयंकर साथ आलेली असताना देखील भारताने आपल्या प्रगतीचा मार्ग सोडलेला नाही. या काळात देखील भारताने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू ठेवला होता, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

हिंदी English

leave a reply