महाराष्ट्रात पावसाचे ३५ हून अधिक बळी

- लाखो हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसान

मुंबई – गुलाब चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणीय परिस्थितीमुळे मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात या पावसाने दाणादाण उडविली असून प्रचंड पूर आला आहे. कित्येक धरणांतून पाणी सोडण्यात आले परिस्थिती बिकट बनली आहे. गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात पावसामुळे निरनिराळ्या घटनांमध्ये ३५ हून अधिक जणांचा बळी गेल्याची आशंका वर्तविली जात आहे. तसेच कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवड्यातच लाखो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

महाराष्ट्रात पावसाचे ३५ हून अधिक बळी - लाखो हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसानसोमवारी रात्रीपासून राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा इशारा हवामानखात्याने दिला होता. मंगळवार आणि बुधवारी पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील गावांत पुराचे पाणी शिरले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या भागात पुरात अडकलेल्या सुमारे २५० जणांची सुखरुप सुटका केली आहे. पुरामुळे सुमारे १४९ गावांचा संपर्क तुटला आहे. दुधना, पूर्णा, गोदावरी, कसुरा, लेंडी, कर्परा, कोद्री या नद्यांना पूर आला असून, नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे बीड जिल्ह्यात तीन, उस्मानाबाद व परभणी येथे प्रत्येकी दोन, जालना, नांदेड, लातूर, वैजापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये काल पुराच्या पाण्यात एसटीवाहून गेली होती. या दुर्घटनेत चार प्रवासी वाहून गेले होते.

औरंगाबाद जिल्ह्याला पावसामुळे पुरते झोडपून काढले असून शिवना नदिला पुर आला. तर जायकवाडी धरण भरले असून या धरणाचं १८ दरवाजे बुधवारी उघडण्यात आले. त्यामुळे ही पूरपस्थिती आणखी बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसाचे ३५ हून अधिक बळी - लाखो हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसानजयकवाडी नदीतून सोडण्या येणार्‍या पाण्यामुळे गोदावरी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. येवला शहर व तालुक्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. तर बुलढाण्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. येथील येळगाव धरण भरले असून धरणातून पाणी वाहत असल्याने औरंगाबादमधील मार्गावरील वाहतूक थांबली आहे.

पैनगंगा नदीला पूर आल्याने मराठवाडयाचा विदर्भाशी असलेला संपर्क तुटलाय. इसापूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. पैनगंगा नदीच्या पुलावरून मोठया प्रमाणात पाणी वाहत असल्याने नांदेड-नागपूर दरम्यानची वाहतूक सकाळ पासून बंद करण्यात आली. मराठवाड्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. नाशिकमध्ये सलग तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकमधली धरणे भरली आहेत. गंगापूर धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

यावर्षी राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून आतापर्यंत आतापर्यंत ४३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सुमारे २०० जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. सप्टेंबर महिन्यात सुमारे ८५ जणांचा अतिवृष्टीत बळी गेला आहे. यासह पावसामुळे सुमारे २२ लाख लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

leave a reply