ब्रिटनमधील कोरोना विषाणूचा नवा प्रकार जगभरात फैलावेल

- वरिष्ठ ब्रिटीश अधिकार्‍यांचा इशारा

विषाणूचा नवा प्रकारलंडन – गेल्यावर्षी ब्रिटनच्या केंट भागात आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार लवकरच पूर्ण जगभरात पसरु शकतो, असा इशारा ब्रिटनमधील तज्ज्ञ व वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात जगभरातील कोरोना रुग्ण व बळींची संख्या घसरत असतानाच हा इशारा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या अधिकार्‍यांपाठोपाठ ब्राझिलच्या आरोग्यमंत्र्यांनीही लॅटिन अमेरिकेत सापडलेला कोरोना विषाणूचा प्रकार तिप्पट वेगाने पसरत असल्याची भीती व्यक्त केली आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या १० कोटींवर गेली असून २३ लाखांहून अधिक जण दगावले आहेत. त्याचवेळी अमेरिका विषाणूचा नवा प्रकारव ब्रिटनसह प्रमुख देशांमधील रुग्णवाढीचा वेग कमी होत असल्याचेही समोर येत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत अमेरिका व ब्रिटनसारख्या प्रमुख देशांमध्ये रुग्ण तसेच बळींची टक्केवारी ५० टक्क्यांनी घटल्याचे उघड झाले आहे. यामागे लसीकरणाची मोहीम व निर्बंध हे घटक कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर, ब्रिटनच्या ‘कोविड-१९ जिनॉमिक्स युके कन्सोर्टियम’च्या संचालक शेरॉन पीकॉक यांनी ब्रिटनमधील ‘केंट व्हेरिअंट’ हा विषाणूचा नवा प्रकारकोरोनाव्हायरसचा प्रकार जगभरात फैलावण्याचा इशारा दिला. सध्या जगातील ५० देशांमध्ये ‘केंट व्हेरियंट’ पसरल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूचा हा प्रकार इतरांपेक्षा ७० टक्के वेगाने पसरत असून ३० टक्के अधिक घातक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. सध्याच्या लसी या प्रकाराचा मुकाबला करण्यात सक्षम दिसत असल्या तरी विषाणूच्या प्रकारात बदल झाल्याच त्या निष्प्रभ ठरु शकतात, अशी भीतीही पीकॉक यांनी व्यक्त केली.

सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली होती. त्यानंतर युरोपिय देशांसह जगातील अनेक प्रमुख देशांनी ब्रिटनमधील प्रवासावर निर्बंध जाहीर केले होते. ब्रिटनमधील विषाणूच्या प्रकाराव्यतिरिक्त ब्राझिल तसेच दक्षिण आफ्रिकेतही विषाणूचे नवे प्रकार आढळले होते.

leave a reply