सैन्यमाघारीमुळे अमेरिकेला नव्या ९/११ चा धोका

- अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम

वॉशिंग्टन – ‘अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याच्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेवरील नव्या ९/११च्या हल्ल्याची शक्यता वाढली आहे. या सैन्यमाघारीमुळे अफगाणिस्तानातील युद्ध संपलेले नाही तर याउलट हे युद्ध विस्तारले आहे’, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पूर्ण सैन्यमाघार घेण्याची घोषणा केल्याबरोबर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रिपब्लिकन सिनेटर असलेल्या ग्रॅहम यांनी बायडेन यांच्या या निर्णयामुळे अल कायदा, आयएस या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या सत्तेवर येतील, अशी चिंता व्यक्त केली.

बायडेन यांचा निर्णय अफगाणिस्तानची वाट अधिकच बिकट करणारा आहे. यामुळे कट्टरपंथिय संघटना एकजूट करतील आणि आधीच्या तुलनेत या दहशतवादी संघटनांकडून अमेरिकेच्या सुरक्षेला असलेला धोका अधिकच वाढेल, असा इशारा ग्रॅहम यांनी दिला. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातील दिर्घकालिन युद्ध संपविण्याचा नाही तर तो अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतल्याचा ठपका ग्रॅहम यांनी ठेवला.

leave a reply