‘पुलवामा’ हल्ल्याप्रकरणी ‘एनआयए’कडून दहशतवाद्यांच्या हस्तकाला अटक

NIA-Pulwamaश्रीनगर – गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एका व्यवसायिकाला पुलावामधून अटक केली. पाकिस्तानच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने घडविलेल्या या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी ‘ एनआयए’ने आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचा तपास ‘एनआयए’ करीत आहे. मंगळवारी एनआयने पुलवामामधून ‘बिलाल अहमद कचे’याला अटक केली. पुलवामामध्ये त्याचा व्यवसाय आहे. तसेच या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांंना आणि हल्लेखोरांना त्याने आश्रय दिला होता. तसेच बिलालने या हल्लेखोरांसाठी मोबाईल्स खरेदी केले होते. या मोबाईल्सवरुनच ते पाकिस्तानमधल्या ‘जैश’च्या दहशतवाद्यांशी संपर्कात होते. बिलालने खरेदी केलेल्या एका मोबाईलवरुन अदिल दार या दहशतवाद्याने दिलेल्या चिथावणीचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. हल्ल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Pulvama-NIAबिलालला दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची कसून चौकशीकरण्यात येईल. त्याच्या चौकशीत महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता, एनआयएच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. गेल्या गुरुवारी ‘एनआयए’ने जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये राहणाऱ्या ‘मोहम्मद इक्बाल राठेर’ला अटक केली होती. हा जैशचा सदस्य होता. तर पुलवामाच्या हल्ल्यादरम्यान त्याने जम्मूच्या महामार्गावरच्या गाड्यांची पाहणी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला ‘एनआयए’ने या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली होती.

leave a reply