रशियाच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपातील ‘नॉर्डिक’ देशांकडून लढाऊ विमानांच्या संयुक्त ताफ्याची योजना

कोपनहेगन/ऑस्लो – युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपातील ‘नॉर्डिक’ देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वीडन, फिनलँड, नॉर्वे व डेन्मार्क यांच्या लढाऊ विमानांचा एकच ताफा (फ्लीट) तयार करण्यात येणार आहे. या ताफ्यात चार देशांची मिळून जवळपास अडीचशे लढाऊ विमाने असतील, अशी माहिती डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रशियाच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपातील ‘नॉर्डिक’ देशांकडून लढाऊ विमानांच्या संयुक्त ताफ्याची योजनारशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व नाटोकडून युरोपिय देशांमधील लष्करी तैनाती व संरक्षणक्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी फिनलँड व स्वीडन या दोन देशांना नाटोचे सदस्यत्व देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ या देशांमध्ये नाटोचे तळ उभारून तैनाती करण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला नाटोचे सदस्य असणाऱ्या युरोपिय देशांनी या देशांबरोबर संरक्षणसहकार्य वाढविण्यासाठीही पावले उचलली आहेत.

डेन्मार्क व नॉर्वे हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. त्याचवेळी हे देश युरोपातील ‘नॉर्डिक’ देश म्हणून ओळखण्यात येणाऱ्या गटाचाही भाग आहेत. या पार्श्वभूमीवर डेन्मार्क व नॉर्वेने फिनलँड व स्वीडनबरोबर संरक्षणदलांमधील समन्वय वाढविण्यासाठी हवाईसंरक्षण क्षेत्रात एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपातील ‘नॉर्डिक’ देशांकडून लढाऊ विमानांच्या संयुक्त ताफ्याची योजनाया प्रस्तावानुसार, ‘युनिफाईड नॉर्डिक एअर डिफेन्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. या संयुक्त हवाईदलात चार देशांच्या जवळपास २५० लढाऊ विमानांचा समावेश असेल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

नॉर्डिक देशांचा ‘युनिफाईड नॉर्डिक एअर डिफेन्स’ हे युरोपातील सर्वात मोठे हवाईदल म्हणून कार्यरत होईल, अशी ग्वाही डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हवाईदलात ‘ग्रिपेन’, ‘एफ-१६’, ‘एफ/ए-१८ हॉर्नेट’, ‘एफ-३५’ या लढाऊ विमानांचा समावेश असेल, असे सांगण्यात येते. ‘युनिफाईड नॉर्डिक एअर डिफेन्स’मध्ये इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल, ऑपरेशनल प्लॅनिंग, फ्लेक्झिबल डिप्लॉयमेंट, जॉईंट सर्व्हिलन्स ॲण्ड ट्रेनिंगची तरतूद असल्याचेही समोर आले आहे.

leave a reply