पाकिस्तानकडून तालिबानला स्फोटकांचा पुरवठा सुरूच

- अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांचा आरोप

स्फोटकांचा पुरवठा

काबुल – देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी अफगाण सरकार तालिबानबरोबर वाटाघाटी करीत आहे. असे असतानाही पाकिस्तानकडून तालिबानला हजारो ‘आईडी’ स्फोटकांचा पुरवठा सुरू ठेवलेला आहे, असा घणाघाती आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या सुरक्षा समितीने उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांना दिलेल्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला होता. पाकिस्तान तालिबानला करीत असलेला स्फोटकांचा पुरवठा अफगाणिस्तानच्या स्थैर्यावर परिणाम करणारा ठरत असल्याची टीका सालेह यांनी केली.

leave a reply