चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाईन्सकडून स्प्रॅटले बेटसमूहांच्या क्षेत्रात ‘फ्लोटिंग मार्कर्स’ची तैनाती

मनिला/बीजिंग – साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाईन्सने या भागातील स्प्रॅटले बेटांनजिक ‘फ्लोटिंग मार्कर्स’(बायोज्‌‍) तैनात केले आहेत. फिलिपाईन्सच्या सागरी सीमांची सुरक्षा व सार्वभौमत्त्वाचा अधिकार कायम राखणे या उद्देशांनी हे बायोज्‌‍ तैनात करण्यात आल्याचे फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले होते. गेल्या काही महिन्यात चीनच्या जहाजांकडून फिलिपाईन्सच्या क्षेत्रात सातत्याने घुसखोरी सुरू असून विरोध करणाऱ्या फिलिपिनी जहाजांना धमकावण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्स सरकारने केलेली तैनाती महत्त्वाची ठरते.

चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाईन्सकडून स्प्रॅटले बेटसमूहांच्या क्षेत्रात ‘फ्लोटिंग मार्कर्स’ची तैनातीगेली कित्येक वर्षे साऊथ चायना सीच्या वादावरुन चीन व फिलिपाईन्समध्ये तणाव निर्माण झाला आहे. फिलिपाईन्सचे सागरी क्षेत्र असलेले ‘वेस्ट फिलिपाईन्स सी’चा भागदेखील आपल्या मालकीचा असल्याचा दावा चीन करीत आहे. या सागरी क्षेत्रातील ‘स्प्रॅटले’ आणि ‘स्कारबोरो’ या द्विपसमुहांवर फिलिपाईन्सचा प्रशासकीय अधिकार आहे. पण २०१२ साली चीनने येथील काही बेटांवर आपला हक्क असल्याचे सांगून त्यांचे लष्करीकरण तसेच काही कृत्रिम बेटांची निर्मितीही सुरू केली होती.

फिलिपाईन्सने सदर प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेल्यानंतर चीनच्या विरोधात निकाल गेला होता. चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाईन्सकडून स्प्रॅटले बेटसमूहांच्या क्षेत्रात ‘फ्लोटिंग मार्कर्स’ची तैनातीचीनने या बेटांच्या क्षेत्रातून माघार घ्यावी, असे निर्देश देण्यात आले होते. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत चीनने फिलिपाईन्स दावा करीत असलेल्या बेटांवरील अतिक्रमण सुरू ठेवले आहे. या सागरी क्षेत्रात गस्त घालणाऱ्या फिलिपाईन्सच्या नौदल व तटरक्षदलांच्या जहाजांना चीनच्या नौदलाकडून सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत.चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाईन्सकडून स्प्रॅटले बेटसमूहांच्या क्षेत्रात ‘फ्लोटिंग मार्कर्स’ची तैनाती

फेब्रुवारी महिन्यात चीनच्या जहाजाने फिलिपिनी तटरक्षकदलाच्या जहाजावर लेझर रोखले होते. तर एप्रिल महिन्यात चीनच्या तटरक्षकदलाच्या जहाजाने फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाच्या जहाजाला आक्रमकपणे धडक देण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या या कारवाया फिलिपाईन्स सरकारने गांभीर्याने घेतल्या असून आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्प्रॅटले बेटांनजिकची बायोजची तैनाती त्याचाच भाग ठरते.

हिंदी English

 

leave a reply