पोलंडसह काही युरोपियन देशांकडून युद्ध थांबविण्यासाठी युक्रेनवर दबाव

- अमेरिकी शोधपत्रकार सेमूर हर्श यांचा दावा

वॉशिंग्टन/किव्ह – युरोपातील काही देश युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर युद्ध थांबविण्यासाठी दबाव आणत असल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीचे पत्रकार सेमूर हर्श यांनी केला आहे. पोलंड हा देश या गटाचे नेतृत्त्व करीत असून आवश्यकता भासल्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी राजीनामा देण्याचीही तयारी ठेवावी, अशी मागणी करण्यात आल्याचे हर्श यांनी आपल्या दाव्यात म्हंटले आहे. हर्श यांचा हा दावा समोर येत असताना आफ्रिकी देशांनी रशिया व युक्रेनमध्ये शिष्टमंडळ पाठविण्याचे जाहीर केले असून दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी हे शिष्टमंडळ चर्चा करेल, असे स्पष्ट केले.

पोलंडसह काही युरोपियन देशांकडून युद्ध थांबविण्यासाठी युक्रेनवर दबाव - अमेरिकी शोधपत्रकार सेमूर हर्श यांचा दावारशिया-युक्रेन युद्धाला १४ महिन्यांहून अधिक काळ उलटला असून हे युद्ध रणांगणावर संपण्याची कोणतीही शक्यता सध्या दृष्टिपथात नाही. रशियाने आपल्या हल्ल्यांची तीव्रता कायम ठेवली असून उद्दिष्टे पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असे वारंवार स्पष्ट केले आहे. तर युक्रेनकडून प्रतिहल्ल्यांची तयारी सुरू असून क्रिमिआवर ताबा मिळविल्याशिवाय संघर्ष थांबविणार नसल्याचे सत्ताधारी राजवटीकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनला समर्थन करणाऱ्या पाश्चिमात्य देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काही देशांमधील जनमतही युद्धाच्या विरोधात जाण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत रशिया-युक्रेन संघर्षबंदीसाठी विविध पातळ्यांवर वेग आल्याचे दिसत आहे. पोलंडसह काही युरोपियन देशांकडून युद्ध थांबविण्यासाठी युक्रेनवर दबाव - अमेरिकी शोधपत्रकार सेमूर हर्श यांचा दावाचीनचे विशेष दूत युक्रेनसह युरोपिय देशांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. चीनकडून सुरू असलेल्या शांतीप्रक्रियेच्या प्रयत्नांना फ्रान्स व हंगेरी यासारख्या देशांनी समर्थन दिले आहे. फ्रान्स चीनच्या सहकार्याने रशिया व युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी आपण शांतीप्रक्रियेसाठी बोलणी करीत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पोप फ्रान्सिस यांची भेटही घेतली होती.

पोलंडसह काही युरोपियन देशांकडून युद्ध थांबविण्यासाठी युक्रेनवर दबाव - अमेरिकी शोधपत्रकार सेमूर हर्श यांचा दावाया हालचाली सुरू असतानाच आता अमेरिकी पत्रकार हर्श यांनी पोलंडकडूनही युद्ध थांबविण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलंडबरोबर हंगेरी, लिथुआनिया, लाटव्व्हिया व इस्टोनिया या बाल्टिक देशांनीही युक्रेनला युद्ध थांबविण्याचे आवाहन केल्याचे हर्श यांनी आपल्या दाव्यात म्हंटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आडमुठी भूमिका घेतली असून त्यामुळे ते पाश्चिमात्यांचे समर्थन गमावित चालल्याचा ठपकाही अमेरिकी पत्रकारांनी ठेवला.

हिंदी English

 

leave a reply