चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने युद्धसज्जतेला वेग दिला आहे

- संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांच्या इशारा

बीजिंग/वॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकेकडून खरेदी केलेल्या शस्त्रांच्या बळावर तैवानला चीनपासून वेगळे राखण्याचे इरादे उधळण्यात येतील व त्यासाठी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने युद्धसज्जतेला वेग दिला आहे, असा खरमरीत इशारा संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल तान केफेई यांनी दिला. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेली मोहीम चिरडून टाकेल, असेही कर्नल केफेई यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने तैवानला ५० कोटी डॉलर्सचे शस्त्रसहाय्य देण्याची घोषणा करून ही प्रक्रिया ‘फास्ट ट्रॅक’ करण्याचे जाहीर केले होते. यावर चीनकडून प्रतिक्रिया उमटलल्याचे दिसत आहे.

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने युद्धसज्जतेला वेग दिला आहे - संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांच्या इशारारशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तैवानच्या सागरी क्षेत्रातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. यासाठी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून सातत्याने आयोजित करण्यात येणारे युद्धसराव तसेच तैवानच्या हद्दीत वारंवार होणारी घुसखोरी या घटना कारणीभूत ठरल्या आहेत. मार्च व एप्रिल अशा सलग दोन महिन्यांमध्ये चीनच्या लष्कराने तैवानच्या सागरी हद्दीनजिक व्यापक युद्धसरावांचे आयोजन केले होते.

मार्च महिन्यात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या आखातात आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या युद्धसरावाचे आयोजन केले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या युद्धसरावात चीनची लढाऊ विमाने, विनाशिकांनी तैवानच्या ‘मीडियन लाईन’ची मर्यादा ओलांडली होती. चीनच्या या युद्धसरावावर अमेरिका व मित्रदेशांनी टीका केली होती. पण याची अजिबात पर्वा न करणाऱ्या चीनने एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात पुन्हा तैवानच्या हवाई व सागरी सुरक्षेला आव्हान दिले.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची ३८ लढाऊ तसेच बॉम्बर विमाने आणि ६ विनाशिकांनी तैवानच्या आखाताजवळून प्रवास केला होता. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने युद्धसज्जतेला वेग दिला आहे - संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांच्या इशारायातील काही विमानांनी तैवानला घिरट्या घातल्या. चीनच्या या हवाई गस्तीमध्ये ‘टीबी-००१’ या बॉम्बर ड्रोनचाही समावेश होता. या ड्रोनने तैवान व फिलिपाईन्सला वेगळी करणारी बाशीची खाडी ओलांडून गस्त घातली. चीनच्या या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या पोसायडन विमानानेही तैवानच्या हवाईहद्दीनजिक टेहळणी केली होती. या घटनांमुळे तणाव वाढला असतानाच अमेरिकेने तैवानला नव्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली.

तैवानला ५० कोटी डॉलर्सची शस्त्रास्त्रे तातडीने पुरविण्यात येणार असून त्यात क्षेपणास्त्र यंत्रणा व ड्रोन्सचा समावेश असू शकतो. तैवानने अमेरिकेकडे ‘एफ-१६व्ही’ या लढाऊ विमानांचीही मागणी केली असून त्यावरदेखील अमेरिका सकारात्मक निर्णय घेईल, असे संकेत ‘पेंटॅगॉन’च्या सूत्रांनी दिले आहेत. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने युद्धसज्जतेला वेग दिला आहे - संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांच्या इशाराअमेरिकेकडून जाहीर झालेल्या या नव्या शस्त्रपुरवठ्यामुळे चीन भडकला असून तैवान व अमेरिकेला धमकावल्याचे दिसत आहे.

गेल्याच महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला प्रत्यक्ष युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सदर्न थिएटर कमांडने चीनचा सार्वभौम भूभाग आणि सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी तयारी करावी, अशी सूचना राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दिली होती. या सूचनेच्या पार्श्वभूमीवर, तैवानबाबत भावनिक असलेला चीन कधीही, २०२५ सालाआधीच हल्ला चढवू शकतो व यामुळे अमेरिका-चीन यांच्यात युद्ध भडकू शकते, असा इशारा चीनविषयक विश्लेषक गॉर्डन चँग यांनी दिला होता.

हिंदी

 

leave a reply