खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाच्या परवानगीचा प्रस्ताव विचाराधीन

मुंबई – लॉकडाऊनमुळे लोकल सेवा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे होत असेलेले हाल लक्षात घेता महाराष्ट्र सरकारकडून आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याच्या योजनेला अंतिम स्वरुप देण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

लोकल प्रवास

सध्या खासगी कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नसल्याने या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रामुख्याने वसई. विरार, पालघर. कल्याण, ठाणे अशा दूरवरच्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या कर्मचाऱ्यांना बस, एसटी, कार पूल अथवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ लागत आहे.

कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेता लोकल सेवा सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे सरकारकडून लोकल सुरु कारण्यासंदर्भात विचार करण्यात येत असून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल सुरु करण्यात येईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी कार्यालयांना त्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत मिळेल.

leave a reply