तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याची जनतेला पुरेशी जाणीव नाही

- आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क

वॉशिंग्टन – तिसऱ्या महायुद्धाचा भडका कधीही उडू शकतो. मात्र बहुतांश जनतेला याची अजूनही नीट जाणीव झालेली नाही, असा दावा जगातील आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी केला. सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी व्यापक युद्धाची भीती वर्तविली होती. त्यासंदर्भातील एका मुद्यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी हा इशारा दिला आहे.

जग निद्रितावस्थेत व्यापक युद्धाच्या खाईच्या दिशेने चालले असल्याची चिंता आपल्याला सतावत असल्याचे गुतरेस म्हणाले होते. ल्युक रुसकोवस्कि या राजकीय विश्लेषकांनी जागतिक समुदायाने तिसरे महायुद्ध टाळायला हवे, असे आवाहन केले होते. त्यावर बोलताना मस्क यांनी या धोक्याची कल्पना जनतेला नसल्याचे म्हटले आहे.

तिसऱ्या महायुद्धाचा भडका कधीही उडू शकतो आणि बहुतांश जनतेला याची नीट कल्पना नाही, असा दावा केला. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन संघर्षाबाबत बोलतानाही मस्क यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत वक्तव्य करून लक्ष वेधून घेतले होते.

leave a reply