पुतिन यांची धमकी गांभीर्याने घ्यायला हवी

ब्रिटनच्या मंत्र्यांनी बजावले

European_Unionasलंडन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेन युद्धाबाबत केलेली वक्तव्ये व अणुयुद्धाची धमकी गांभीर्याने घ्यायला हवी, असे ब्रिटनच्या परराष्ट्र विभाग कार्यालयाच्या मंत्री गिलिअन किगन यांनी बजावले. पुतिन यांनी दिलेली अण्वस्त्रहल्ल्यांची धमकी व अतिरिक्त सैन्यतैनातीची घोषणा यामुळे जगभरात खळबळ उडाली असून युक्रेनसह पाश्चिमात्य देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अमेरिकेच्या युक्रेनमधील राजदूत ब्रिजेट ब्रिंक यांनी, सार्वमत व अतिरिक्त तैनातीची घोषणा या गोष्टी रशियाचा कमकुवतपणा दाखविणाऱ्या आहेत, अशी टीका केली आहे.

Putin's threatजर्मनीचे व्हाईस चॅन्सेलर रॉबर्ट हॅबेक यांनी, रशियाचे निर्णय म्हणजे अजून एक वाईट व चुकीचे पाऊल असल्याचे म्हंटले आहे. तर पुतिन यांना शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा नसून युद्धाला अधिक चिथावणी देण्यात रस आहे, अशी प्रतिक्रिया युरोपिय महासंघाने दिली. सध्या सुरू असलेली मोहीम नियोजित मार्गाने पुढे जात नसल्याने रशियन राष्ट्राध्यक्षांना हे पाऊल उचलावे लागल्याचा ठपका युक्रेनने ठेवला आहे.

नेदरलॅण्डस्‌‍चे पंतप्रधान मार्क रुट यांनी मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष ‘पॅनिक’ झाल्याचा दावा करून अण्वस्त्रांबाबत केलेल्या वक्तव्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हंटले आहे. युरोपातील पोलंड, लाटव्हिया, रोमानिया, मोल्दोव्हा या देशांनीही पुतिन यांच्या घोषणांवर नाराजी व्यक्त केली आहे.

leave a reply