इस्रायल, अमेरिकेच्या विमानांचा ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव सुरू

us bomber israel jets israel drillनेलीस – पर्शियन आखाताच्या दिशेने प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या ‘बी-५२’ बॉम्बर्स विमानांना इस्रायलच्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानांनी सोबत केली. अमेरिका व इस्रायलच्या विमानांची ही गस्त इराणसाठी इशारा असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. तर नेमक्या ह्याचवेळी नेवाडा येथे इस्रायल व अमेरिकेच्या हवाईदलाचा संयुक्त रेड फ्लॅग युद्धसराव सुरू झाला आहे.

इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचल्याचा दावा केला जातो. तर कुठल्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचे इशारा इस्रायल देत आहे. अशा परिस्थितीत, इस्रायल व अमेरिकेच्या विमानांनी भूमध्य समुद्र ते रेड सीच्या क्षेत्रापर्यंत संयुक्त गस्त पूर्ण केली. इराण तसेच आखातातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना इशारा देण्यासाठी सदर हवाई गस्त सहाय्यक ठरल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेच्या नेवाडा प्रांतात इस्रायलचे हवाईदलाने अमेरिकेसोबत दोन आठवड्यांचा ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव सुरू केला आहे. या सरावात इस्रायल तसेच अमेरिकेची ‘एफ-३५’ विमाने देखील सहभागी होणार आहे. इराणच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्यासाठी इस्रायल एफ-३५ विमानांचा वापर करू शकतो, अशा बातम्या आल्या होत्या. त्यामुळे अमेरिका-इस्रायलमधील हा सराव देखील इराणसाठी इशाराच असल्याचे दिसत आहे.

leave a reply