गाझातील दहशतवादी संघटनांकडून इस्रायलच्या लष्कराला धमकी

israel west bank palestineगाझा – इस्रायलच्या लष्कराने वेस्ट बँकमध्ये दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईमुळे हमास, इस्लामिक जिहाद या गाझापट्टीतील संघटना खवळल्या आहेत. तीन पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी घेणाऱ्या इस्रायलविरोधातील संघर्ष सुरूच राहणार असल्याची घोषणा हमास, इस्लामिक जिहादने केली. वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कारवाईत हमास, इस्लामिक जिहादचेच दहशतवादी ठार झाले होते. त्यामुळे या दोन्ही दहशतवादी संघटनांकडून ही प्रतिक्रिया उमटली आहे.

इस्रायलच्या लष्कराने गेल्या काही दिवसांपासून वेस्ट बँकमध्ये दडलेल्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम छेडली आहे. हमास, इस्लामिक जिहाद व इतर दहशतवादी संघटनांच्या सदस्यांना शोधून इस्रायल त्यांच्यावर कारवाई करीत आहे. ज्यूधर्मियांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांनाच आपण लक्ष्य करीत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. तर इस्रायल निष्पाप पॅलेस्टिनींचा बळी घेत असल्याचा आरोप पॅलेस्टिनी संघटना करीत आहेत. अशा परिस्थितीत, हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी थेट इस्रायललाच धमकी दिली आहे. इस्रायलविरोधात सुरू केलेला संघर्ष थांबणार नसल्याचे या दहशतवादी संघटनांनी म्हटले आहे.

leave a reply