ब्रिटनमध्ये अवैध घुसखोरीला प्रसिद्धी देणार्‍या पोस्ट काढा

- ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांचा सोशल मीडियाला इशारा

लंडन – ब्रिटनच्या सागरी हद्दीतून अवैध घुसखोरी करणार्‍या निर्वासितांना व गुन्हेगारी टोळ्यांना प्रसिद्धी देणार्‍या पोस्ट ताबडतोब काढून टाका, असा खरमरीत इशारा गृहमंत्री प्रीति पटेल यांनी दिला आहे. कारवाई करण्याची हीच वेळ आहे, अन्यथा नंतर खूप उशिर झालेला असेल, असेही ब्रिटीश गृहमंत्र्यांनी यावेळी बजावले. ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडल्यानंतर बेकायदा निर्वासितांच्या मुद्यावर आक्रमक धोरण घेण्यात येत असून नवा इशारा त्याचाच भाग मानला जातो.

ब्रिटनमध्ये अवैध घुसखोरीला प्रसिद्धी देणार्‍या पोस्ट काढा - ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांचा सोशल मीडियाला इशारागृहमंत्री प्रीति पटेल यांनी, फेसबुक, ट्विटर व टिकटॉक सारख्या सोशल मीडियातील आघाडीच्या कंपन्यांना उद्देशून एक पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. या पत्रात त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दात, अवैधरित्या होणारी घुसखोरी घडविणार्‍या गुन्हेगारी टोळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा बिनधास्तपणे फायदा उचलत असल्याचा आरोप केला. या प्लॅटफॉर्म्सवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांसह गुन्हेगारी टोळ्यांना अनाठायी प्रसिद्धी देण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

या वेबसाईटस्वर, घुसखोरी करताना किती जणांचे बळी गेले आहेत किंवा इतर गोष्टींची माहिती दिली जात नसल्यकडेही गृहमंत्री प्रीति पटेल यांनी लक्ष वेधले. घुसखोरीदरम्यान होणारी जीवितहानी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असून, ही हानी टाळायची असेल तर संबंधित कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून प्रसिद्धी देणे ताबडतोब थांबवायला हवे, असे ब्रिटीश गृहमंत्र्यांनी यावेळी बजावले.

मार्च महिन्यात, गृहमंत्री प्रीति पटेल यांनी ब्रिटनचे धोरण जाहीर करताना अवैध व बेकायदेशी मार्गांनी ब्रिटनमध्ये प्रवेश करणार्‍या कोणालाही स्थान मिळणार नाही, असा खणखणीत इशारा दिला होता. त्यानंतर ब्रिटनने सुरक्षाव्यवस्था भक्कम करणे व इतर उपायांच्या माध्यमातून अवैध घुसखोरांविरोधात आक्रमक मोहीम राबविली आहे. गृहमंत्री प्रीति पटेल यांनी पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना दिलेला इशाराही त्याचाच भाग मानला जात आहे.

दरम्यान, ब्रिटनमधील एक लेखक एड हुसेन यांनी आपल्या पुस्तकात, ब्रिटनमध्ये इस्लामधर्मियांची वस्ती असलेली काही क्षेत्रे गौरवर्णियांसाठी ‘नो-गो एरिआज्’ (प्रतिबंधित क्षेत्रे) बनल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या इस्लामधर्मियांच्या काही भागांमध्ये स्त्रिया व मुलांवर तालिबानच्या राजवटीप्रमाण नियम लादले जात असल्याचेही हुसेन यांनी म्हटले आहे. आपल्या पुस्तकात त्यांनी ‘ब्लॅकबर्न’ व ‘ब्रॅडफोर्ड’ या भागांचा उल्लेख केला आहे.

leave a reply