गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले

गाझा/जेरूसलेम – इस्रायलने गाझापट्टीतील इस्लामिक जिहादच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बुधवारी गाझातील दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले. याच्या प्रत्युत्तरादखल इस्रायलने गाझावर केलेल्या कारवाईत एकजण ठार झाला. दरम्यान, इस्रायलने मंगळवारी केलेल्या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये रशियन नागरिकाचाही समावेश आहे.

गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्लेइस्रायलच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी गाझापट्टीतील रफाह व इतर शहरांमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १५ जण ठार झाले. यामध्ये इस्लामिक जिहादच्या तीन वरिष्ठ कमांडर्सचा समावेश असल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षणदलाने दिली. पण गाझावर हल्ले चढवून इस्रायलने पॅलेस्टिनींचा बळी घेतल्याचा आरोप हमास व इस्लामिक जिहाद करीत आहे. या हल्ल्याची जबर किंमत इस्रायलला चुकवावी लागेल, अशी धमकी या दोन्ही दहशतवादी संघटनांनी दिली होती. यानंतर मंगळवारी रात्री गाझातून इस्रायलच्या दिशेने रॉकेट्सचा मारा करण्यात आला होता.

पण इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेने हे हल्ले उधळले. त्यानंतर इस्रायलने गाझात चढविलेल्या हल्ल्यात एकाचा बळी गेला. दरम्यान, गाझातील रॉकेट हल्ल्यांची तीव्रता वाढू शकते, हे ओळखून इस्रायलने सीमेजवळील हजारोजणांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

हिंदी English

 

leave a reply