युक्रेनच्या सीमेवर रोमानियाचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले

- नऊ जवानांचा बळी

लष्करी हेलिकॉप्टरबुखारेस्ट – युक्रेनच्या सीमेजवळ ब्लॅक सीच्या सागरी क्षेत्रात रोमानियाचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जवानांचा बळी गेला. रोमानियन लष्कराच्या बेपत्ता लढाऊ विमानाचा शोध घेत असताना या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती या देशाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. लढाऊ विमानाच्या वैमानिकाने खराब हवामानाची माहिती दिल्यानंतर सदर विमानाला तळावर परतण्याचे आदेश मिळाले होते.

लष्करी हेलिकॉप्टरआठ दिवसांपासून युक्रेन-रशियामध्ये संघर्ष सुरू आहे. काही तासांपूर्वीच नाटोचे लष्कर तसेच अमेरिका, जर्मनी व इटलीची लढाऊ विमाने रोमानियात दाखल झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा परिस्थितीत, रोमानियाचे मिग-२१ लढाऊ विमान बेपत्ता होणे आणि हेलिकॉप्टरचा अपघात, या खरोखरच दुर्घटना आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

leave a reply