रशियाकडून आर्क्टिक क्षेत्रात लष्करी सरावाची घोषणा

आर्क्टिक क्षेत्रातमॉस्को – गेल्या महिन्यात झालेल्या ‘आर्क्टिक कौन्सिल’च्या बैठकीत इतर देशांबरोबर झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने अधिक आक्रमक धोरणाचे संकेत दिले आहेत. नजिकच्या काळात आर्क्टिक क्षेत्रात व्यापक लष्करी सराव आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा रशियाच्या ‘नॉर्दर्न फ्लीट’ने केली आहे. सरावाची घोषणा करतानाच, ‘नॉन-आर्क्टिक’ देशांनी आर्क्टिकमध्ये लष्करी तैनाती वाढविण्याची गरज नाही, असा इशारा रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला.

आर्क्टिक क्षेत्रातमे महिन्यात झालेल्या आर्क्टिक कौन्सिलच्या बैठकीपूर्वी, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी आर्क्टिक क्षेत्रावर रशियाचाच अधिकार असल्याचे बजावले होते. कौन्सिलच्या बैठकीत अमेरिका व इतर देश रशियाच्या हालचालींवर नाराजी व्यक्त करीत असतानाच, रशियानेही नाटोने आर्क्टिकमध्ये लुडबुड करु नये, असा स्षष्ट इशारा दिला होता. त्यापाठोपाठ रशियाने आर्क्टिकमधील आपल्या नव्या संरक्षणतळाची माहितीही उघड केली होती. या घटना रशियाच्या आक्रमक धोरणाचा भाग असल्याचे मानले जाते.

आर्क्टिक क्षेत्रातहेच धोरण पुढेही कायम ठेवण्याचे संकेत रशियाने नव्या लष्करी सरावाच्या घोषणेतून दिले आहेत. सरावाचा निश्‍चित कालावधी जाहीर करण्यात आला नसला तरी येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये हा सराव घेण्यात येईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. आर्क्टिकमध्ये तैनात लष्करी तुकड्यांची सज्जता तपासणे व ‘नॉर्दर्न सी रुट’ची सुरक्षितता या दोन उद्देशांनी सदर सराव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती रशियाच्या ‘नॉर्दर्न फ्लीट’ने दिली आहे.

आर्क्टिक क्षेत्रातसरावाची घोषणा होत असतानाच रशियाचे ‘आर्क्टिक कौन्सिल’मधील राजदूत निकोलाय कोर्शुनोव्ह यांनी, आर्क्टिक क्षेत्रातील ‘नॉन-आर्क्टिक’ देशांच्या हालचालींवर टीका केली आहे. ‘गेल्या काही वर्षात आर्क्टिकमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे. त्यामुळे या भागात नवे मार्ग तयार होत आहेत. त्याचा फायदा घेऊन इतर देशांच्या या क्षेत्रातील लष्करी हालचाली वाढल्याचे दिसत आहे.

आर्क्टिक क्षेत्रातआर्क्टिकमध्ये संघर्षाची शक्यता नसून लष्करीदृष्ट्या विशेष आव्हान असल्याचेही दिसत नाही. अशा स्थितीत नॉन-आर्क्टिक देशांनी आर्क्टिक क्षेत्रातील देशांच्या हद्दीनजिक लष्करी तैनाती करण्याचे काहीच कारण नाही’, असे कोर्शुनोव्ह यांनी बजावले. त्यांचा हा इशारा नाटो सदस्य देशांची तैनाती व सरावासाठ होता, असे सांगण्यात येते.

दरम्यान, रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनी रशियाच्या विरोधकांना नवा इशारा दिला आहे. रशियाची क्षेत्रीय अखंडता व सार्वभौमत्त्वाविरोधात कोणी चुकीची पावले उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात पांरपारिक व अपारंपारिक अशा दोन्ही प्रकारे जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल, असे पत्रुशेव्ह यांनी बजावले. यात आर्थिक स्तरावरील कारवाईबरोबरच लष्करी बळाचाही समावेश असेल, असे पत्रुशेव्ह यांनी म्हंटले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही, रशिया शत्रूचे दात पाडून ठेवेल, असे बजावले होते.

leave a reply