रशियाकडून ‘मोबाईल अँटी सॅटेलाईट कॉम्बॅट सिस्टिम’ विकसित

मॉस्को – रशियाच्या लष्कराने नवी ‘मोबाईल अँटी सॅटेलाईट कॉम्बॅट सिस्टिम’ विकसित केली आहे. रशियाच्या संरक्षण विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या ‘व्होएनाया मिस्ल’ या जर्नलमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ‘कॉन्टॅक्ट अँटी-स्पेस डिफेन्स कॉम्प्लेक्स’ असे या यंत्रणेचे नाव आहे. या यंत्रणेत ‘मिग-३१ इंटरसेप्टर’, ‘आयएल-७६ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट’, ‘ए६० सोकोल-एकेलॉन कॉम्बॅट लेझर सिस्टिम’, ‘पेरेस्वेट कॉम्बॅट लेझर सिस्टिम’ व ‘७९एम६ कॉन्टॅक्ट अँटी सॅटेलाईट मिसाईल’ यांचा समावेश आहे.

रशियाकडून ‘मोबाईल अँटी सॅटेलाईट कॉम्बॅट सिस्टिम’ विकसितरशिया व चीन हे दोन्ही देश अंतराळयुद्धाची तयारी करीत असल्याचे आरोप अमेरिकेसह युरोपिय देशांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अमेरिकेने रशियाच्या अंतराळातील कारवायांची माहितीही सातत्याने प्रसिद्ध केली होती. या पार्श्वभूमीवर, रशियाने उपग्रहभेदी यंत्रणेची माहिती उघड करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

रशियात उपग्रहभेदी यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न १९८०च्या दशकापासून सुरू होते. २००९ साली रशियाने अँटी सॅटेलाईट सिस्टिम विकसित करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २०१८ साली रशियाच्या मिग-३१ विमानावर तैनात केलेल्या एका अज्ञात क्षेपणास्त्राचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर २०२० साली रशियाच्या संरक्षणक्षेत्रातील एका कंपनीने ‘कॅरिअर एअरक्राफ्ट फॉर कॉम्बॅट लेझर सिस्टिम’चे पेटंट घेतल्याची माहिती दिली होती.

हिंदी English

 

leave a reply