सुदानमधील गृहयुद्धाला रशिया जबाबदार

- अमेरिकन माध्यमांचा आरोप

वॉशिंग्टन/खार्तूम – गेल्या आठवड्याभरापासून सुदानमध्ये भडकलेल्या गृहयुद्धासाठी रशिया आणि रशियाची वॅग्नर ही कंत्राटी सेना जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकन माध्यमांनी सुरू केला. सुदानमधील सोन्यासाठी रशियाने बंडखोर निमलष्करीदलाला हाताशी धरून लष्कराविरोधात बंड घडवून आणल्याचा ठपका या माध्यमांनी ठेवला आहे. रशिया तसेच वॅग्नरने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. गेल्या दोन वर्र्षांपासून आपले जवान सुदानमध्ये तैनात नाहीत, असा दावा वॅग्नर ग्रुपनेे केला. दरम्यान, आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी अमेरिका सुदानमध्ये लष्कर घुसविण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्याही येत आहेत.

सुदानमधील गृहयुद्धाला रशिया जबाबदार - अमेरिकन माध्यमांचा आरोप15 एप्रिल रोजी सुदानची राजकीय सूत्रे हाती असणाऱ्या लष्कर आणि निमलष्करीदलात संघर्ष पेटला. या संघर्षाच्या तिसऱ्याच दिवशी राजधानी खार्तूममध्ये अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या वाहनावर गोळीबार झाला होता. अमेरिकन राजनैतिक अधिकारी या हल्ल्यातून बचावले. सुदानमधील कुठल्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नव्हती. पण अमेरिकन माध्यमांनी यासाठी रशियाच्या वॅग्नर ग्रुप या कंत्राटी कंपनीला जबाबदार धरले. वॅग्नरच्या जवानांनी हा हल्ला चढविल्याचा आरोप या माध्यमांनी केला.

त्याचबरोबर सुदानमध्ये संघर्ष करणाऱ्या बंडखोर निमलष्करीदलाला रशियाने शस्त्रास्त्रे पुरविल्याचा दावाही अमेरिकन माध्यमे करीत आहेत. सोन्याच्या साठ्याने संपन्न असलेल्या सुदानची खनिजसंत्ती ताब्यात घेण्यासाठी रशिया या देशात गृहयुद्ध भडकवीत असल्याचा आरोप अमेरिकन माध्यमांनी केला. पण रशिया तसेच वॅग्नरने आपल्यावरील हे आरोप फेटाळले. सुदानमधील प्रत्येक राजवटीबरोबर रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध होते, याची आठवण रशियाने करुन दिली आहे.

सुदानमधील गृहयुद्धाला रशिया जबाबदार - अमेरिकन माध्यमांचा आरोपसुदानचे राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर तसेच त्यानंतर सुदानची सत्ता हाती घेणारे लष्करप्रमुख जनरल बुरहान तसेच निमलष्करीदलाचे प्रमुख जनरल दागालो यांच्याशी रशियाचे उत्तम संबंध होते, असे रशियाने म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी सुदानचा दौरा करुन जनरल बुरहान यांची भेट घेतली होती. यावेळी ‘पोर्ट सुदान’मध्ये रशियाचा नौदल तळ उभारण्याबाबत चर्चा झाली होती. सुदानच्या लष्करप्रमुखांनी रशियाची ही मागणी मान्य केली होती. त्यावेळी सुदानमध्ये सर्वकाही व्यवस्थित होते, याकडे रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी लक्ष वेधले.

गेल्या दोन महिन्यातच सुदानमधील परिस्थिती बिघडली आहे, असा पलटवार रशियाने केला. तर दोन वर्षांपूर्वीच आपल्या जवानांनी सुदानमधून माघार घेतल्याचे वॅग्नर ग्रुपने म्हटले आहे. सुदानमधील गृहयुद्धाला रशिया जबाबदार - अमेरिकन माध्यमांचा आरोपसुदानच्या दोन्ही गटांकडे रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे असल्याचा अमेरिकन माध्यमांनी केलेला आरोपही वॅग्नरने फेटाळला. तर सुदानमध्ये गृहयुद्ध भडकल्यानंतर अमेरिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना दूतावास न सोडण्याची सूचना केली होती. तरीही खार्तूममधील अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याचे वाहन दूतावासाबाहेर कसे काय गेले, असा प्रश्न काही विश्लेषक करीत आहेत.

या सुदानमध्ये गृहयुद्ध भडकविण्यासाठी रशियावर आरोप करणारी अमेरिकाच याप्रकरणी दोषी दिसत असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. पोर्ट सुदान रशियाच्या ताब्यात गेल्यामुळे नाराज झालेल्या देशांनी सुदानमध्ये गृहयुद्ध भडकविले तर नाही ना, अशी शक्यताही हे विश्लेषक वर्तवित आहेत. आखाती देशांप्रमाणे अमेरिका आफ्रिकेतील आपला प्रभावही गमावून बसत चालला आहे व यासाठी बायडेन प्रशासन जबाबदार असल्याची टीका हे विश्लेषक करीत आहेत.

leave a reply