तैवानबाबत जळजळीत प्रतिक्रिया देणाऱ्या चीनला दक्षिण कोरियाकडून राजनैतिक प्रत्युत्तर

सेऊल/बीजिंग/वॉशिंग्टन – तैवानवरुन चीन आणि दक्षिण कोरियामध्ये चकमक उडाली आहे. तैवान हा चीनपर्यंत मर्यादित असलेला मुद्दा नसून उत्तर कोरियाप्रमाणे तैवानदेखील जागतिक प्रश्न असल्याचे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी म्हटले होते. यावर चीनने तैवान आपला अविभाज्य घटक असून याप्रकरणी कुठल्याही देशाचे नाक खुपसणे खपवून घेणार नसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने धमकावले. या अरेरावीमुळे संतापलेल्या दक्षिण कोरियाने चीनच्या राजदूतांना समन्स बजावून त्यांची खरडपट्टी काढली.

तैवानबाबत जळजळीत प्रतिक्रिया देणाऱ्या चीनला दक्षिण कोरियाकडून राजनैतिक प्रत्युत्तरदोन दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येओल यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उत्तर कोरिया आणि तैवान हे दोन्ही समान प्रश्न असल्याचे म्हटले होते. अणुकार्यक्रम आणि प्रक्षोभक चाचण्यांमुळे उत्तर कोरिया हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे. अगदी त्याच धर्तीवर तैवान हादेखील जागतिक सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो, असे राष्ट्राध्यक्ष येओल म्हणाले होते.

त्याचबरोबर लष्करी बळावर तैवानप्रकरणी यथास्थिती बदलण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींमुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाल्याची चिंता दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली. याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वीकारलेल्या भूमिकेला दक्षिण कोरियाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले. तैवानबाबत जळजळीत प्रतिक्रिया देणाऱ्या चीनला दक्षिण कोरियाकडून राजनैतिक प्रत्युत्तरयावर तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनकडून जळजळीत प्रतिक्रिया आली होती.

तैवान हा पूर्णपणे चीनचा अंतर्गत मुद्दा ठरतो आणि दक्षिण कोरिया याबाबत चीनबरोबरच्या कराराचे पालन करील, अशी अपेक्षा असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले. त्याचबरोबर तैवानमधील विघटनवादी गटांना सहाय्य करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असेही चीनने बजावले. अमेरिका व मित्रदेशांना उद्देशून चीनने हा इशारा दिला होता. याची दक्षिण कोरियाने गंभीर दखल घेतली व राजधानी सेऊलमधील चीनच्या राजदूतांना या प्रकरणी समन्स बजावले.

दरम्यान, तैवान हा अमेरिका व चीनमधील संघर्षाचा मुद्दा ठरू शकतो, असा इशारा सिंगापूरचे पंतप्रधान ली हेन लूंग यांनीही दिला आहे.

leave a reply