रशियाकडून ‘सी ऑफ जपान’मध्ये कॅलिबर क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्राची चाचणी

russia sub kalibr missile seaमॉस्को – ‘सी ऑफ जपान’मध्ये युद्धसराव करणाऱ्या रशियन नौदलाने कॅलिबर क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती घोषित केली. युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामध्ये रशियाने या क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत, जपानबरोबर वाद असलेल्या सागरी क्षेत्रात रशियाकडून या क्षेपणास्त्राची चाचणी लक्ष वेधून घेणारी घटना घडली आहे. युक्रेनबरोबरच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले असून रशियाचे लष्कर मोठ्या प्रमाणात या युद्धात गुंतलेले असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. या युद्धात रशियन लष्कराचे जबर नुकसान झाल्याचेही पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे. मात्र युक्रेनबरोबरच्या युद्धात गुंतलेल्या रशियाने आपल्या मित्रदेशांबरोबरचे युद्धसराव सुरू ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘सी ऑफ जपान’मध्ये सुरू असलेल्या युद्धसरावात रशियन नौदलाने पाणबुडीतून कॅलिबर क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्राची चाचणी केली. या सरावात रशियन क्षेपणास्त्राने 1000 किलोमीटर अंतरावर बेटावरील लक्ष्य यशस्वीरित्या भेदल्याचे रशियाने जाहीर केले.

दरम्यान, सी ऑफ जपान व कुरील बेटांच्या अधिकारावरुन रशिया आणि जपानमध्ये जुना वाद आहे. गेल्या काही वर्षांपासून रशिया व जपानने चर्चेद्वारे हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण युक्रनेच्या युद्धानंतर अमेरिकेच्या गटात असणाऱ्या जपानने रशियाबरोबरच्या चर्चेतून माघार घेतली. तर रशियानेही येथील सागरी क्षेत्रात युद्धसरावांचा सपाटा लावला आहे.

leave a reply