युक्रेनच्या रेल्वेस्थानकांवर हल्ले चढवून रशियाचा अमेरिकेला इशारा

- ब्रिटिश माध्यमांचा दावा

किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हसह लिव्ह, रिव्हने आणि विनिइस्ता येथील पाच रेल्वेस्थानकांवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ले चढविले. तसेच पोलंडच्या सीमेपासून अवघ्या 70 मैल अंतरावर असलेल्या युक्रेनच्या क्रास्ने येथील विद्युत उपकेंद्रालाही रशियाने लक्ष्य केले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकनआणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या युक्रेनच्या दौऱ्यानंतर रशियाने ही कारवाई केली. ब्लिंकन यांनी रेल्वेद्वारे युक्रेनला भेट दिली होती. त्यानंतर रशियाने युक्रेनच्या पाच रेल्वेस्थानकांवर हल्ले चढवून अमेरिका तसेच नाटो सदस्य देशांना इशारा दिल्याचा दावा ब्रिटनची माध्यमे करीत आहेत. तसेच रशियाचे हल्ले युक्रेनच्या पूर्वेकडील भागापर्यंत मर्यादित राहिले नसून पश्चिमेकडील शहरांपर्यंत पोहोचल्याचे पाश्चिमात्य माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

leave a reply