रशियन बॉम्बर्स व लढाऊ विमानांची युरोपच्या हवाईहद्दीनजिक गस्त

Europe's airspaceमॉस्को/ऑस्लो – रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच रशियाने आपल्या लष्करी हालचालींची व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसात रशियन ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ व लढाऊ विमानांनी युरोपिय देशांच्या हवाईहद्दीनजिक दोनदा गस्त घातल्याची माहिती उघड झाली आहे. रशियन विमानांचा हा वाढता वावर पाश्चिमात्य देशांना इशारा असू शकतो, असा दावा माध्यमांनी केला आहे.

Russian bomber jets intercepted by NORAD1सोमवारी रशियाच्या तीन विमानांनी पोलंडच्या हद्दीनजिक गस्त घातली. या विमानांमध्ये दोन ‘सुखोई-२७’ व ‘आयएल-२०एम’ या टेहळणी विमानांचा समावेश आहे. नेेदरलॅण्डस्‌‍च्या संरक्षण विभागाने रशियन विमानांना वॉर्निंग देण्यासाठी दोन ‘एफ-३५’ धाडली होती. या विमानांच्या इशाऱ्यानंतर रशियन विमाने माघारी फिरली, असा दावा नेदरलॅण्डस्‌‍कडून करण्यात आला आहे. रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्यानंतर मंगळवारी रशियाच्या ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ विमानांसह लढाऊ विमानांनी नॉर्वेजिअन सी तसेच अलास्कानजिकच्या क्षेत्रात गस्त घातली. यात दोन ‘टीयू-६०’ व दोन ‘टीयू-९५ एमएस’सह सुखोई-३० लढाऊ विमानांचा समावेश होता. अमेरिकेच्या ‘नोराड कमांड’ने याला दुजोरा दिला असून रशियन विमानांना वॉर्निंग देण्यासाठी ‘एफ-१६’ विमाने धाडल्याची माहिती दिली.
रशियन बॉम्बर्स व लढाऊ विमानांचा वाढता वावर लक्ष वेधून घेणारा ठरतो, असा दावा ब्रिटीश माध्यमांनी केला आहे.

leave a reply