युरोपिय देशांमध्ये रशियन प्रचाराचा प्रभाव वाढतो आहे

- युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

ब्रुसेल्स/मॉस्को – युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांमध्ये रशियन प्रसारमाध्यमे व इतर यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या प्रचाराचा प्रभाव वाढत असल्याचा दावा महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. ‘युरोपिअन कमिशन फॉर व्हॅल्यूज्‌‍ ॲण्ड ट्रान्सपरन्सी’च्या उपाध्यक्ष असणाऱ्या वेरा जोरोवा यांनी युरोपिय देशांमधील काही नागरिक रशिया-युक्रेन युद्धात रशियाची बाजू घेत असल्याकडेही लक्ष वेधले. रशियन प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपिय देशांनी अधिक निधीची तरतूद करायला हवी, असे आवाहनही जोरोवा यांनी केले.

युरोपिय देशांमध्ये रशियन प्रचाराचा प्रभाव वाढतो आहे - युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावाएका जर्मन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जोरोवा यांनी, रशियाकडून करण्यात येणाऱ्या प्रचाराचा युरोपिय जनतेवर मोठा प्रभाव पडत असल्याची जाणीव करून दिली. ‘स्लोव्हाकियासारख्या देशात ५० टक्क्यांहून अधिक नागरिक ‘कॉन्स्पिरसी थिअरीज्‌‍’वर विश्वास ठेवत असून त्यात रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासंदर्भातील दाव्यांचाही समावेश आहे. रशिया हा आक्रमक देश नाही तर पीडित देश असल्याच्या वृत्तांचे समर्थन केले जात आहे’, असे जोरोवा यांनी सांगितले.

रशियाकडून करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या वाढत्या प्रभावाकडे आतापर्यंत युरोपिय देशांनी दुर्लक्ष केल्याची बाबही महासंघाच्या अधिकाऱ्यांनी अधोरेखित केली. रशियन राजवटीने युरोपातील प्रचारासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत, मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण फारसे काही केले नसल्याकडे ‘युरोपिअन कमिशन फॉर व्हॅल्यूज्‌‍ ॲण्ड ट्रान्सपरन्सी’च्या उपाध्यक्ष वेरा जोरोवा यांनी लक्ष वेधले. युरोपिय देशांमध्ये रशियन प्रचाराचा प्रभाव वाढतो आहे - युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावानजिकच्या काळात युरोपिय देशांनी या मुद्याकडे लक्ष देत अधिक गुंतवणूक करायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

महासंघाचा आघाडीचा देश असणारा जर्मनी हे रशियाच्या प्रचारमोहिमेचे मुख्य लक्ष्य असल्याचा दावाही जोरोवा यांनी केला आहे. जर्मनीतील काही चळवळींमध्ये रशियन यंत्रणा घुसखोरी करण्यात यशस्वी ठरल्या असल्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच ‘आरटी’ या रशियन वृत्तवाहिनीवर टाकलेल्या बंदीचे समर्थन करून ही बंदी पुढेही कायम ठेवायला हवी, असे जोरोवा यांनी बजावले. रशियातील सत्ताधारी राजवटीशी संबंध नसणारी प्रसारमाध्यमेही युरोपात कार्यरत असून त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी ‘युरोपिअन कमिशन फॉर व्हॅल्यूज्‌‍ ॲण्ड ट्रान्सपरन्सी’च्या उपाध्यक्षांनी केली आहे.

हिंदी

 

leave a reply