आफ्रिका खंडातील अन्नटंचाईमुळे युरोपात निर्वासितांचे नवे लोंढे धडकतील

- इटलीच्या उपपंतप्रधानांचा इशारा

रोम – रशिया-युक्रेनमधील संभाव्य ‘ग्रेन डील’ अपयशी ठरल्यास आफ्रिका खंडातील देशावर अन्नटंचाई व उपासमारीचे भयावह संकट ओढावण्याची भीती आहे. आफ्रिकी देशांमध्ये अन्नटंचाई निर्माण झाल्यास या देशांमधील निर्वासितांचे लोंढे पुन्हा एकदा युरोपात धडकू शकतात, असा इशारा इटलीचे उपपंतप्रधान ॲन्तोनिओ तजानी यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच युरोपिय महासंघाच्या ‘फ्रंटेक्स’ या यंत्रणेने भूमध्य सागरी क्षेत्रातून युरोपात होणाऱ्या निर्वासितांच्या घुसखोरीत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर इटलीच्या उपपंतप्रधानांचा इशारा महत्त्वाचा ठरतो.

आफ्रिका खंडातील अन्नटंचाईमुळे युरोपात निर्वासितांचे नवे लोंढे धडकतील - इटलीच्या उपपंतप्रधानांचा इशारारशिया-युक्रेनमध्ये झालेल्या ‘ग्रेन डील’ची मुदत १८ मे रोजी संपत आहे. या कराराच्या माध्यमातून युक्रेनमधील अन्नधान्य सागरी मार्गाने आफ्रिका व आशियातील देशांना निर्यात करण्यात येत आहे. कराराला मुदतवाढ मिळण्यात अपयश आल्यास या देशांमधील अन्नधान्याचा पुरवठा थांबण्याची शक्यता आहे. हा पुरवठा रोखला गेल्यास आफ्रिकी देशांमध्ये अन्नटंचाई व उपासमारीचे संकट अधिक तीव्र होऊ शकते. त्याचा फटका आफ्रिकी देशांमधील लाखो नागरिकांना बसण्याची भीती इटलीच्या नेत्यांनी व्यक्त केली.

असे झाल्यास आफ्रिकी देशांमधील निर्वासितांचे मोठे लोंढे पुन्हा एकदा युरोपिय देशांमध्ये धडकतील, असा इशारा उपपंतप्रधान ॲन्तोनिओ तजानी यांनी दिला. आफ्रिकी देशांवर अन्नधान्याचे संकट ओढवू नये म्हणून इटलीसह इतर युरोपिय देश प्रयत्न करीत असल्याचा दावाही तजानी यांनी केला.

आफ्रिका खंडातील अन्नटंचाईमुळे युरोपात निर्वासितांचे नवे लोंढे धडकतील - इटलीच्या उपपंतप्रधानांचा इशाराग्रीस, इटली व स्पेन यासारख्या देशांमध्ये अवैध निर्वासितांचे प्रचंड लोंढे पुन्हा धडकण्यास सुरुवात झाली आहे. २०२२ साली फक्त भूमध्य सागरी मार्गाचा वापर करून जवळपास एक लाख, ६० हजारांहून अधिक निर्वासित दक्षिण युरोपिय देशांमध्ये घुसले होते. २०२१ सालच्या तुलनेत निर्वासितांच्या संख्येत तब्बल ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. यावर्षीही हाच कल कायम असून बेकायदा निर्वासित मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

युरोपिय महासंघाची आघाडीची यंत्रणा असणाऱ्या ‘फ्रंटेक्स’ने नुकतीच यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली. भूमध्य सागरी क्षेत्रातील ‘सेंट्रल मेडिटेरिअन’ व ‘वेस्टर्न मेडिटेरिअन’ या दोन भागांमधून निर्वासितांची विक्रमी घुसखोरी सुरू झाली आहे. एकट्या ‘सेंट्रल मेडिटेरिअन’ भागातून जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये ३० हजारांहून अधिक निर्वासितांची घुसखोरी झाली आहे. यात आफ्रिकी देशांसह पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांचा समावेश आहे.

आफ्रिका खंडातील अन्नटंचाईमुळे युरोपात निर्वासितांचे नवे लोंढे धडकतील - इटलीच्या उपपंतप्रधानांचा इशारा२०२२ सालच्या तुलनेत घुसखोरीमध्ये तब्बल ३०५ टक्क्यांची वाढ झाल्याचे ‘फ्रंटेक्स’कडून सांगण्यात आले. या क्षेत्रात आपण इतक्या विक्रमी पातळीवर निर्वासितांची घुसखोरी झालेली पाहिली नव्हती, असा दावा ‘फ्रंटेक्स’चे प्रमुख हॅन्स लेजटेन्स यांनी केला. एकट्या ट्युनिशिआमधून युरोपात घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांमध्ये १,१०० टक्क्यांची भर पडल्याकडे लेजटेन्स यांनी लक्ष वेधले. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ बदलल्याचा इशाराही फ्रंटेक्सच्या प्रमुखांनी दिला आहे.
यापूर्वी गेल्या दशकात जर्मन सरकारने स्वीकारलेल्या ‘ओपन डोअर पॉलिसी’मुळे युरोपात घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. २०१५ साली भूमध्य सागरातून युरोपात घुसणाऱ्या निर्वासितांची आकडेवारी १० लाखांवर पोहोचली होती.

हिंदी

 

leave a reply