युक्रेनच्या युद्धात विजय झाल्यानंतर रशियाचे पुढचे टार्गेट पोलंड असेल

पोलंडच्या पत्रकाराचा इशारा

वॉर्सा – युक्रेनच्या युद्धात रशियाचा विजय झालाच, तर रशियाचे पुढचे टार्गेट पोलंड असेल, असा चिंता पोलंडला भेडसावत आहे. रशियाच्या विरोधातील युद्धात युक्रेनला पोलंडने केले तितके भरीव सहाय्य इतर देशांनी केले असते, तर एव्हाना युक्रेनचे युद्ध संपुष्टात आले असते, असा दावा पोलंडचे नेते करीत आहेत. त्यामुळे युक्रेनच्या युद्धात रशियाचा विजय झाल्यानंतर पोलंडला त्याची किंमत मोजण्यास रशिया भाग पाडल्यावाचून राहणार नाही, अशी भीती पोलंडचे पत्रकार व्यक्त करीत आहेत. म्हणूनच पोलंडने आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण सुरू केले असून आपला संरक्षणाचा खर्च जीडीपीच्या चार टक्क्यांवर नेल्याची चर्चा सुरू आहे.

victory in ukraine's warपोलंड व युक्रेनमध्ये सुमारे 535 किलोमीटर इतकी सीमा आहे. युद्ध पेटल्यानंतर युक्रेनमधून सुमारे 80 लाख निर्वासित पोलंडमध्ये दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत पोलंडने युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य केले नाही, तर रशियाचे पुढचे टार्गेट पोलंडच असेल, असा दावा या देशाचे उपपरराष्ट्रमंत्री पॉवेल याब्लोन्स्की यांनी केला. मात्र या युद्धात युक्रेनचा पराभव होऊन रशियाचा विजय झाला तरी रशियाचे पुढचे लक्ष्य पोलंड असेल, अशी चिंता पोलंडमध्ये राजकीय पत्रकारिता करणारे लुकास यान्कोव्हस्की यांनी व्यक्त केली. युक्रेनच्या भूभागापुरते रशियाने छेडलेले युद्ध मर्यादित राहणार नाही. तर या युद्धामुळे पूर्व युरोपिय देशांचे स्वातंत्र्य व सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा यान्कोव्हस्की यांनी केला.

रशियाच्या शर्तींवर युक्रेनचे युद्ध थांबले तरी त्याचे परिणाम पोलंडला सहन करावे लागतील, असे यान्कोव्हस्की यांनी बजावले. याआधी पेटलेले रशिया व युक्रेनमधील युद्ध 2014 सालच्या मिन्स्क करारामुळे थांबले होते. पण त्यानंतर युक्रेनमध्ये रशियाधार्जिणे सरकार आले. या सरकारने रशियाला अनुकूल असलेले निर्णय घेतले होते. तसे यावेळीही घडले तर पोलंड अधिकच असुरक्षित बनेल, असा इशारा यान्कोव्हस्की यांनी दिला. हे इशारे देत असताना पोलंडमध्ये आलेल्या युक्रेनी शरणार्थींमुळे निर्माण झालेल्या समस्यांचाही दाखला यान्कोव्हस्की यांनी दिला.

याआधी सुमारे तीस लाखाहून अधिक युक्रेनी पोलंडमध्ये दाखल झाले असून पोलंडच्या प्रत्येक शहरामध्ये युक्रेनी निर्वासित आढळतात. पोलंडच्या एकूण जनसंख्येपैकी युक्रेनमधून आलेल्या निर्वासितांचे प्रमाण आठ टक्क्यांवर गेले आहे, याची जाणीव यान्कोव्हस्की यांनी करून दिली आहे. त्यामुळे या युद्धात रशियाचा विजय होऊन युक्रेनचा पराभव झालाच, तर त्याचे भयावह परिणाम पोलंडला सहन करावे लागतील, असे यान्कोव्हस्की यांनी म्हटले आहे.

leave a reply