खशोगी हत्येप्रकरणी सौदीने अमेरिकेला फटकारले

Khashoggi-murderरियाध – पत्रकार जमाल खशोगीच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी अरेबियाच्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे खवळलेल्या सौदीने इराकमधील अबू घरेब कारागृहाप्रकरणी अमेरिकेनेही मानवाधिकारांचे उल्लंघन केले होते, याची आठवण करून दिली.

2018 साली तुर्कीमध्ये सौदीचा पत्रकार जमाल खशोगी यांच्या निर्घृणरित्या हत्या करण्यात आली होती. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या ज्यो बायडेन यांनी खशोगी हत्येप्रकरणी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना जबाबदार धरले होते. तसेच आपण सत्तेवर आलो तर सौदीच्या मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची घोषणा बायडेन यांनी केली होती. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बायडेन यांनी मानवाधिकारांचे कारण देऊन सौदीचे लष्करी सहाय्य बंद केले. यामुळे अमेरिका-सौदी संबंधांवर परिणाम झाला होता.

तर आता बायडेन यांनी सौदीच्या दौऱ्यातच हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सौदीने त्याला जोरदार उत्तर दिले आहे. सौदीवर आरोप करणाऱ्या अमेरिकेनेही मानवाधिकारांचे भीषण उल्लंघन केले आहे, याकडे सौदीने जगाचे लक्ष वेधले.

leave a reply