सौदी अरेबिया व सिरियात दूतावास सुरू करण्याबाबत एकमत

रियाध/दमास्कस – ‘अरब लीग’ या अरब-आखाती देशांच्या संघटनेतील सिरियाच्या समावेशानंतर सौदी अरेबियाने या देशाबरोबरील राजनैतिक संबंध पुन्हा पूर्ववत करीत असल्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी सौदी अरेबियाने सिरियातील आपला दूतावास पुन्हा एकदा सुरु करीत असल्याची घोषणा केली. सौदीच्या या घोषणेनंतर सिरियाच्या परराष्ट्र विभागानेही सिरियाचा सौदी अरेबियातील दूतावास सक्रिय करीत असल्याचे जाहीर केले.

सौदी अरेबिया व सिरियात दूतावास सुरू करण्याबाबत एकमतगेल्या दशकातील ‘अरब स्प्रिंग’ आंदोलनात आखाती व आफ्रिकी देशातील अनेक राजवटी उलथण्यात आल्या होत्या. सिरियातही राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांची राजवट पाडण्याचे प्रयत्न झाले. अस्साद राजवटीविरोधात लढणाऱ्या बंडखोर गटांना सौदीसह इतर आखाती व अरब देशांकडून सहाय्यही करण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी सिरियन जनतेवर केलेल्या अत्याचारांचे कारण पुढे करीत ‘अरब लीग’ने सिरियाची हकालपट्टी केली होती.

२०१२ साली सौदी अरेबियाने सिरियाबरोबरचे राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेत दूतावास बंद केला होता. सौदी अरेबिया व सिरियात दूतावास सुरू करण्याबाबत एकमतराष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी इराण व रशियाच्या सहाय्याने आपली राजवट टिकविण्यात यश मिळविले होते. गेल्या काही वर्षात आखातातील भूराजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली होती. चीनच्या मध्यस्थीनंतर आखातातील प्रतिस्पर्धी असलेल्या सौदी व इराणने संबंध सुरळीत करण्यासाठी पावले उचलली होती. सौदी व इराणमधील संबंध पूर्ववत होत असतानाच सिरियाला पुन्हा अरब लीगमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

सौदी अरेबिया व सिरियात दूतावास सुरू करण्याबाबत एकमतकाही महिन्यांच्या चर्चेनंतर अरब लीगने सिरियाला पुन्हा सामील करून घेण्याची घोषणा केली. त्यानंतर अरब लीगचे सदस्य असलेल्या देशांनी सिरियाबरोबरील संबंध पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून सौदी अरेबियाकडून दूतावास सुरू करण्याचा निर्णय त्याचाच भाग ठरतो. अमेरिका व युरोपिय देशांचा अस्साद राजवटीला असणारा विरोध अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर, अरब व आखाती देशांचे सिरियाबरोबरील संबंध पूर्ववत होणे ही अमेरिकेसह युरोपिय देशांना मोठी चपराक ठरते.

हिंदी English

 

leave a reply