नॉर्ड स्ट्रीममधील स्फोटांच्या मुद्यावर सुरक्षा परिषदेत चर्चा होणार

न्यूयॉर्क – गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीत झालेल्या स्फोटांच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत चर्चा होणार आहे. रशियाने यासंदर्भात मागणी केली होती. नॉर्ड स्ट्रीममध्ये झालेल्या स्फोटावरून रशिया व पाश्चिमात्य देशांनी परस्परांवर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाने स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

us nord streamपुलित्झर पुरस्कार विजेते अमेरिकी पत्रकार हर्श यांनी गेल्या आठवड्यात आपल्या वेबसाईटवर एक लेख प्रसिद्ध केला. ‘हाऊ अमेरिका टूक आऊट द नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन’ असे या लेखाचे नाव होते. यात त्यांनी अमेरिकी यंत्रणांनी नॉर्वेसह इतर नाटो देशांचे सहाय्य घेऊन ‘नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन’ उडवून दिल्याचा गौप्यस्फोट केला. बायडेन प्रशासनाने त्यांचे हे दावे फेटाळले असून हर्श यांचा लेख म्हणजे ‘फिक्शन’ असल्याचा म्हटले आहे.

रशियाने या लेखात केलेल्या दाव्यांच्या आधारे सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. सप्टेंबर २०२२च्या अखेरच्या आठवड्यात रशिया व युरोपिय देशांमध्ये उभारण्यात आलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतून गूढ इंधनगळती उघडकीस आली होती. या गळतीप्रकरणी नाटो व युरोपिय महासंघाने रशियावर ठपका ठेवला होता. तर रशियाने यामागे अमेरिकाच असल्याचा आरोप केला होता. युरोपने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरविले तर त्यात अमेरिकेलाही संशयित म्हणून सामील करावे, अशी मागणीही रशियाकडून करण्यात आली होती.

leave a reply