रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून लष्करी तुकड्या माघारी घेण्याचे संकेत

मॉस्को/किव्ह – १६ फेब्रुवारीला रशिया युक्रेनवर आक्रमण करेल, असे जाहीर करून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी खळबळ माजविली होती. यानंतर काही देशांनी आपले दूतावास बंद करून आपल्या नागरिकांना युक्रेनमधून माघारी परतण्याचे निर्देश दिले होते. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपल्याला युद्ध नको, विवाद्य मुद्यांवर पाश्‍चिमात्य देशांशी आपली चर्चा सुरू आहे, असे जाहीर केले. त्याचवेळी रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ तैनात केलेले सैन्य मागे घेण्याची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत.

रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून लष्करी तुकड्या माघारी घेण्याचे संकेतगेले काही दिवस अमेरिकेकडून रशिया-युक्रेन संघर्षाबाबत सातत्याने आक्रमक दावे केले जात आहेत. अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांचे वरिष्ठ अधिकारी व माध्यमे सातत्याने रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करु शकतो, असे इशारे देत आहेत. काही दिवसांपूर्वी जर्मन दैनिक ‘डर स्पिगेल’ने, रशियाने १६ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमणाची योजना आखली असल्याचे वृत्त दिले होते. या वृत्तात, पाश्‍चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सदर दावा केल्याचे म्हटले होते.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकताना १६ फेब्रुवारीला रशिया आक्रमण करेल, असे सांगून खळबळ उडविली होती. त्याचवेळी हा दिवस युक्रेन ‘डे ऑफ युनिटी’ म्हणून साजरा करेल, असेही म्हटले होते. रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून लष्करी तुकड्या माघारी घेण्याचे संकेतमात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य समोर येत असताना प्रत्यक्षातील स्थिती बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्यात युक्रेनच्या मुद्यावर चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुतिन यांनी रशियाला युद्ध नको असल्याचे वक्तव्य केले. त्याचवेळी क्षेपणास्त्रे व इतर मुद्यांवर पाश्‍चात्य देशांशी चर्चा सुरू राहिल, असा दावाही केला. जर्मनी हा रशियाचा महत्त्वाचा भागीदार देश असून त्याच्याबरोबरील सहकार्य अधिक वाढविण्यात येईल, असे संकेतही पुतिन यांनी यावेळी दिले.

रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून लष्करी तुकड्या माघारी घेण्याचे संकेतत्यापूर्वी युक्रेनच्या सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव ओलेस्कि डॅनिलोव्ह यांनी रशियाच्या आक्रमणाची शक्यता कमी असल्याचे वक्तव्य केले. ‘युक्रेनच्या हद्दीला धोका आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. आताच्या घडीला रशिया १८ किंवा १७ तारखेला आक्रमण करण्याची शक्यता नाही’, असे डॅनिलोव्ह यांनी म्हटले आहे.

डॅनिलोव्ह यांची वक्तव्ये समोर येत असतानाच रशियाने युक्रेन सीमेनजिकच्या काही लष्करी तुकड्या मागे घेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. रशियाच्या या माघारीवर नाटो व युक्रेनने सावधगिरीची भूमिका घेतली असून ठोस पुरावे समोर आल्याशिवाय विश्‍वास ठेवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. रशियाच्या या माघारीचे वृत्त येण्यापूर्वी अमेरिकेने रशियन तुकड्या हल्ला करण्यासाठी हालचाली करीत असल्याचा इशारा दिला होता.

leave a reply