भारत अमेरिकेचा समविचारी भागीदार देश

-अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची घोषणा

वॉशिंग्टन – ‘भारत हा अमेरिकेचा समविचारी भागीदार देश असलेला भारत दक्षिण आशियाई तसेच हिंदी महासागर क्षेत्राचे नेतृत्त्व भारत करीत आहे. क्वाड संघटनेची चालना देणारी शक्ती आणि या क्षेत्रातील देशांच्या विकासाचे इंजिन ही भारताची ओळख आहे’, अशी स्तुतीसुमने अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने उधळली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या क्वाड देशांच्या बैठकीनंतर व्हाईट हाऊने भारताची ही प्रशंसा केली खरी. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या अरेरावीविरोधात स्थापन झालेल्या क्वाडचे लक्ष चीनकडून रशियाकडे वळविण्याचा अजेंडा अमेरिका राबवत असल्याचे व्हाईट हाऊसच्या माध्यमसचिवांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून उघड होत आहे.

भारत अमेरिकेचा समविचारी भागीदार देश - अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची घोषणाव्हाईट हाऊसच्या माध्यमविषयक उपसचिव कॅरिन जीन-पेरी यांनी पत्रकार परिषदेत मेलबर्नमध्ये पार पडलेल्या क्वाडच्या बैठकीची माहिती दिली. यावेळी भारताचा उल्लेख अमेरिकेचा समविचारी भागीदार देश असा करून जीन-पेरी यांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. दक्षिण आशियाई क्षेत्र व हिंदी महासागर क्षेत्राचे नेतृत्त्व करणारा भारत या क्षेत्रातील देशांची प्रगती आणि विकासाचे इंजिन आहे, असा दावा जीन-पेरी यांनी केला. भारताची ही प्रशंसा करीत असताना जीन-पेरी यांनी क्वाडच्या मेलबर्नमधील बैठकीत रशिया-युक्रेन समस्येवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. नियमावर आधारलेल्या जागतिक व्यवस्थेला रशियाकडून संभवणार्‍या धोक्याचा मुद्दा अमेरिकेने या बैठकीत मांडल्याचे जीन-पेरी म्हणाल्या.

त्यांच्या या दाव्यातून एकाच वेळी अनेक गोष्टी समोर येत आहेत. बायडेन प्रशासन ज्या क्षेत्रातील चीनची अरेरावी संपुष्टत आणण्यासाठी क्वाडची स्थापना झाली, त्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा स्वतंत्र उल्लेख करण्यास तयार नाही. तर जपान, ऑस्ट्रेलिया हे क्वाडचे सदस्यदेश तसेच फ्रान्स व ब्रिटन हे युरोपिय देश मात्र भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मोठी शक्ती असल्याचे वारंवार सांगत आहेत. पण बायडेन यांचे प्रशासन इंडो-पॅसिफिकचा उल्लेख शक्य तितक्या प्रमाणात टाळत असून याद्वारे आपले धोरण बदलत असल्याचे संकेत देत आहे. याबरोबर भारताचा उल्लेख मित्रदेश किंवा सहकारी देश अशारितीने करण्यापेक्षा बायडेन यांचे प्रशासन भारत हा पार्टनर अर्थात भागीदार देश असल्याचे लक्षात आणून देत आहे.

leave a reply