कॅनडापाठोपाठ अमेरिका व युरोपमध्येही ट्रकचालकांच्या ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाचे संकेत

- अमेरिका व कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचा दावा

ओटावा/वॉशिंग्टन – कॅनडात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या ट्रकचालकांच्या ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाची झळ आता अमेरिका व युरोपिय देशांनाही बसण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने बायडेन प्रशासनाला यासंदर्भात इशारा दिला आहे. कॅनडातील ट्रकचालकांच्या आंदोलनाने अमेरिका व कॅनडाला जोडणारे मार्गही रोखून धरले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसण्यास सुरुवात झाली असून अमेरिकेतील आघाडीच्या वाहनकंपन्यांना उत्पादन थांबवावे लागल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

कॅनडापाठोपाठ अमेरिका व युरोपमध्येही ट्रकचालकांच्या ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाचे संकेत - अमेरिका व कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचा दावाकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी गेल्या महिन्यात कोरोनासंदर्भात केलेल्या नव्या नियमांविरोधात ट्रकचालकांनी आंदोलनाची घोषणा केली होती. कॅनडातील हजारो ट्रकचालक राजधानी ओटावात दाखल झाले आहेत. या ट्रकचालकांनी संसदेनजिकच्या परिसरासह शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये आपले ट्रक उभे करून ठेवले आहेत. त्याचवेळी राजधानी ओटावासह क्युबेक, टोरोंटो व इतर अनेक शहरांमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या ट्रकचालकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत राजधानीत ठिय्या देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सुरुवातीला फक्त कॅनडापुरत्या मर्यादित असलेल्या या आंदोलनाला आता जगभरातून समर्थन मिळण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका व युरोपिय देशांमध्ये कॅनडाच्या ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’च्या धर्तीवर आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यापासून ते राजधानी वॉशिंग्टनपर्यंत आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू असल्याचा इशारा ‘डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी’ या विभागाने दिला आहे. कॅनडापाठोपाठ अमेरिका व युरोपमध्येही ट्रकचालकांच्या ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाचे संकेत - अमेरिका व कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचा दावाया आंदोलनामुळे अमेरिकेतील ‘सुपर बाऊल’ हा कार्यक्रम तसेच राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या ‘स्टेट ऑफ द युनियन ऍड्रेस’मध्ये अडचणी येऊ शकतात, असा दावा इशार्‍यात करण्यात आला आहे.

कॅनडाच्या ट्रकचालकांनी कॅनडा व अमेरिकेला जोडणार्‍या पुलांवर ठिय्या मांडण्यास सुरुवात केल्याने दोन देशांमधील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही देशांमध्ये रस्त्याद्वारे होणार्‍या व्यापाराला फटका बसला आहे. अमेरिकेतील ‘फोर्ड’ व ‘टोयोटा’ या आघाडीच्या वाहनकंपन्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. टोयोटोने कॅनडाच्या ओंटारिओ शहरातील फॅक्टरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेपाठोपाठ युरोपातही ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’च्या समर्थनार्थ हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या आंदोलनाचा धोका लक्षात घेऊन युरोपिय देशांनी आधीच कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्स, बेल्जियम तसेच ऑस्ट्रिया या देशांमध्ये ट्रकचालकांना एक येण्यापासून रोखण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

leave a reply