रशिया व चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या संरक्षणखर्चात सहा अब्ज डॉलर्सची वाढ

- पंतप्रधान ॠषी सुनाक यांची घोषणा

सॅन दिएगो/लंडन – रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण व चीनकडून निर्माण झालेल्या अभूतपूर्व आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ब्रिटनने आपल्या संरक्षणखर्चात मोठी वाढ जाहीर केली आहे. पुढील दोन वर्षात ब्रिटन आपल्या संरक्षणखर्चासाठी अतिरिक्त सहा अब्ज डॉलर्सची तरतूद करीत असल्याची घोषणा पंतप्रधान ॠषी सुनाक यांनी केली. यावेळी ब्रिटनकडून संरक्षण व परराष्ट्र धोरणाचा फेरआढावा घेणारा ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू रिफ्रेश २०२३’ हा ‘पॉलिसी पेपर’ही प्रसिद्ध करण्यात आला. यात ब्रिटनने पहिल्यांदाच तैवानचा उल्लेख केल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.

रशिया व चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या संरक्षणखर्चात सहा अब्ज डॉलर्सची वाढ - पंतप्रधान ॠषी सुनाक यांची घोषणाब्रिटनचे पंतप्रधान सुनाक सध्या अमेरिका दौऱ्यावर असून अमेरिकेत दाखल होण्यापूर्वीच त्यांनी संरक्षणखर्चातील वाढीची घोषणा केली. येत्या काही वर्षात ब्रिटन आपला संरक्षणखर्च जीडीपीच्या २.५ टक्क्यांपर्यंत नेईल, असे सांगून सुनाक यांनी सहा अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त तरतुदीची घोषणा केली. ही तरतूद बजेटमधील संरक्षण तरतूद तसेच २०२० साली करण्यात आलेली घोषणा यापेक्षा वेगळी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यातील काही भाग युक्रेनला करण्यात आलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे ब्रिटनच्या संरक्षणदलात निर्माण झालेली शस्त्रांची टंचाई भरून काढण्यासाठी वापरण्यात येईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. उर्वरित हिस्सा अमेरिका व ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या ‘ऑकस पॅक्ट’साठी दिला जाईल, असेही सुनाक यांनी सांगितले.

पंतप्रधान सुनाक यांनी जाहीर केलेल्या अतिरिक्त तरतुदीवर संसद सदस्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी लष्करी वर्तुळात मात्र नाराजी आहे. रशिया व चीनसारखे धोके समोर असताना ब्रिटनने आपला संरक्षणखर्च जीडीपीच्या तीन टक्क्यांपर्यंत न्यायला हवा, अशी मागणी काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केली होती. रशिया व चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या संरक्षणखर्चात सहा अब्ज डॉलर्सची वाढ - पंतप्रधान ॠषी सुनाक यांची घोषणासंरक्षणखर्चासाठी अतिरिक्त तरतूद करतानाच ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू रिफ्रेश २०२३’ हा ‘पॉलिसी पेपर’ही प्रसिद्ध करण्यात आला.

यापूर्वी ब्रिटनने २०२१ साली सुरक्षा, परराष्ट्र धोरण व संरक्षण धोरण यांचा एकत्रित आढावा घेणारा ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू’ प्रसिद्ध केला होता. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यात सुधारणा घडविण्यात आल्या असून नव्या ‘पॉलिसी पेपर’मध्ये रशिया व चीनच्या धोक्याला प्राधान्य देण्यात आले आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या हालचाली ब्रिटनच्या प्रत्येक क्षेत्रातील धोरणांना पद्धतशीर आव्हान देत असल्याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे. चीनच्या कारवायांकडे ब्रिटन डोळेझाक करू शकत नाही, याची जाणीवही ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू रिफ्रेश २०२३’मध्ये करून देण्यात आली आहे.

हिंदी English

 

leave a reply