तैवानला अमेरिकेकडून अतिप्रगत लढाऊ विमानांच्या निर्मितीत सहकार्य हवे आहे

तैपेई – तैवानचे हवाईदल दरदिवशी चीनच्या लढाऊ विमानांच्या घुसखोरीविरोधात धावून जात आहे. तैवानच्या ताफ्यात अमेरिकेची एफ-16 तसेच फ्रेंच बनावटीची मिराज विमाने आहेत. पण चीनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी तैवानला अमेरिकेकडून पुढच्या पिढीतील अतिप्रगत लढाऊ विमानांच्या निर्मितीत सहाय्य अपेक्षित आहे, असे आवाहन तैवानच्या ‘एरोस्पेस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-एआयडीसी’ने केले.

तैवानला अमेरिकेकडून अतिप्रगत लढाऊ विमानांच्या निर्मितीत सहकार्य हवे आहेचीनने तैवानवर ‘ग्रे झोन वॉरफेअर’चे प्रयोग सुरू केले आहेत. चीनची लढाऊ विमाने आणि गस्तीनौका सातत्याने तैवानच्या हद्दीत शिरकाव करीत आहेत. अशा परिस्थितीत तैवानला बलाढ्य चीनचा सामना करण्यासाठी अतिप्रगत लढाऊ विमानांची निर्मिती करणे आवश्यक वाटू लागले आहे. यासाठी तैवानला अमेरिकेचे सहाय्य अपेक्षित असल्याचे ‘एआयडीसी’ने केलेल्या आवाहनावरून स्पष्ट होत आहे.

रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविण्यासाठी अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेकडे कानाडोळा केल्याची टीका सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एआयडीसीच्या आवाहनाचे महत्त्व वाढले आहे.

हिंदी

 

leave a reply