अमेरिकेने दक्षिण कोरियात अण्वस्त्रे तैनात करावी

- अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार

सेऊल – अमेरिका आणि मित्रदेशांना धोकादायक ठरणाऱ्या उत्तर कोरियाला सुस्पष्ट संदेश देण्यासाठी अमेरिकेने दक्षिण कोरियात अण्वस्त्रांची तैनाती करावी, असा सल्ला अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला. यामुळे दक्षिण कोरिया देखील अण्वस्त्रांच्या निर्मितीचा विचार करणार नाही, असे बोल्टन यांनी सुचविले.

अमेरिकेने दक्षिण कोरियात अण्वस्त्रे तैनात करावी - अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागारदक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली होती. यावेळी बायडेन यांनी दक्षिण कोरियामध्ये आण्विक पाणबुडी तैनात करण्याची घोषणा केली होती. उत्तर कोरिया अणुहल्ल्याच्या धमक्या देत असताना दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून मोठ्या लष्करी सहकार्याची अपेक्षा केली होती. अशा परिस्थितीत, आण्विक पाणबुडीच्या तैनातीची घोषणा करून बायडेन प्रशासनाने दक्षिण कोरियाची निराशा केल्याची टीका झाली होती.

या पार्श्वभूमीवर, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन यांनी दक्षिण कोरियात अण्वस्त्रांची तैनात करण्याचे सुचविले आहे. याआधीही 1958 साली अमेरिकेने दक्षिण कोरियात अण्वस्त्रांची तैनाती केली होती. पण 1991 साली वाढत्या विरोधानंतर अमेरिकेने दक्षिण कोरियातील अण्वस्त्रे काढून घेतली होती. त्यानंतर उत्तर कोरियाच्या या क्षेत्रातील आण्विक हालचाली वाढल्या आहेत.

हिंदी

 

leave a reply