अफगाणिस्तानातील हल्ल्यावरून तालिबानचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानला इशाराकाबुल – अफगाणिस्तानच्या कुनर प्रांतातील खोस्त येथे पाकिस्तानी लष्कराने चढविलेल्या हवाई हल्ल्यात ४० अफगाणींचा बळी गेला होता. महिला आणि मुलांचाही समावेश आहे. याची गंभीर दखल तालिबानने घेतली असून याचा तालिबानने निषेध नोंदविला. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने पाकिस्तानला याचा जाब विचारला जाईल, असे बजावले. तसेच पाकिस्तानच्या या हल्ल्याविरोधात अफगाणिस्तानात आंदोलने सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत.

अफगाणिस्तानच्या सीमाभागात पाकिस्तानात घातपात माजविणार्‍या दहशतवाद्यांचे तळ आहेत, असा आरोप पाकिस्तानकडून केला जातो. काही दिवसांपूर्वी या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकार्‍यासह पाकिस्तानचे आठ जवान ठार झाले होते. याच्या दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्तमध्ये हवाई हल्ला चढविला होता. दहशतवाद्यांच्या विरोधात हा हल्ला चढविल्याचे पाकिस्तानला इशारादावे पाकिस्तानी लष्कराकडून केले जात असले, तरी प्रत्यक्षात या हल्ल्यात महिला व मुलांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे.

याचे फार मोठे पडसाद अफगाणिस्तानात उमटले असून या हल्ल्याविरोधात निदर्शने सुरू झाली. तालिबानच्या राजवटीनेही याची दखल घेतली असून यावरून पाकिस्तानला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानची राजवट या हल्ल्याचा जाब पाकिस्तानला विचारल्यावाचून राहणार नाही, असे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने बजावले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, हे वास्तव आहे आणि दोन्ही देशांमध्ये यामुळे वैर निर्माण होऊ शकते, असा पाकिस्तानला इशाराइशारा मुजाहिद याने दिला. तसेच पुढच्या काळात असे हल्ले होऊ नये, यासाठी तालिबानची राजवट योग्य ती पावले उचलेल, अशी धमकी मुजाहिदीने पाकिस्तानला दिली.

या प्रकरणातून युद्ध पेटले, तर ते कुणाच्याही भल्याचे नसेल, हे पाकिस्तानने समजून घ्यावे, असे सांगून मुजाहिदने नेमक्या शब्दात पाकिस्तानला परिणामांची जाणीव करून दिली. दरम्यान, खोस्त प्रांतात हल्ला चढवून पाकिस्तानच्या लष्कराने युद्धाची आणखी एक आघाडी सुरू केल्याची चिंता या देशातील काही विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. देशातील राजकीय विसंवाद आणि आर्थिक संकट तीव्र झालेले असताना, अशा स्वरुपाची कारवाई करून तालिबानला आव्हान देण्याची चूक पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे, असा इशारा हे विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply