२०२२ सालात जर्मनीतील निर्वासितांची संख्या १२ लाखांवर जाईल

स्थानिक वर्तमानपत्राचा दावा

बर्लिन – २०१५ साली इराक, सिरियामध्ये ‘आयएस’चे दहशतवादी नरसंहार करीत असताना युरोपवर निर्वासितांची लाट आदळली होती. पण सात वर्षांपूर्वीचे संकटही थिटे पडेल, असा निर्वासितांचा लोंढा लवकरच जर्मनीला धकड देणार आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत जर्मनीतील निर्वासितांची संख्या १२ लाखांवर जाईल, असा दावा ‘वेल्ट एम सोनाग’ या वर्तमानपत्राने केला. निर्वासितांच्या लोंढ्याबाबत ठोस भूमिका नसल्यामुळे जर्मनी डोळे झाकून या संकटाच्या दिशेने पावले टाकत चालल्याचा इशारा जर्मन संसद सदस्याने दिला.

germany migration२०१५ साली जर्मनीमध्ये आठ लाख ९० हजार निर्वासितांनी धडक दिली होती. त्यानंतर गेली सहा वर्षे जर्मनीत प्रवेश करणाऱ्या निर्वासितांची संख्या कमी झाली होती. यामध्ये सिरिया, अफगाणिस्तान, तुर्की व इराकमधून दाखल होणाऱ्या निर्वासितांची मोठी संख्या होती. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्वासितांचा मोठा लोंढा युरोपिय देशांच्या दिशेने निघाल्याचा दावा केला जातो.

यातील बहुसंख्य युक्रेनी निर्वासित जर्मनीत दाखल होईल, अशी माहिती जर्मन वर्तमानपत्राने दिली. जर्मनीच्या सरकारने निर्वासितांबाबत स्वीकारलेले धोरण यासाठी जबाबदार असल्याचे बोलले जाते. पण जर्मन संसद सदस्य मॅनफ्रेड वेबर यांनी निर्वासितांच्या या लोंढ्यासाठी सरकारला दोषी धरले आहे. युक्रेनी निर्वासितांच्या लोंढ्याबरोबर येणाऱ्या आव्हानांकडे जर्मनीच्या सरकारने दुर्लक्ष करू नये, असे वेबर यांनी बजावले.

निर्वासितांसाठी तयार केलेली ठिकाणे तुडूंब भरलेली आहेत. या युक्रेन युद्धामुळे आधीच जर्मनीला इंधनसंकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनी निर्वासितांचा लोंढा जर्मनीत धडकला तर आपल्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. व्यायामशाळांमध्ये या निर्वासितांना जागा करून द्यावी लागू शकते आणि इंधनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शाळा आणि व्यापारी कार्यक्रमांवर मर्यादा टाकाव्या लागू शकतात. पण जर्मनी अशा संकटासाठी तयार नसल्याची चिंता वेबर यांनी व्यक्त केली.

leave a reply