अन्न, वैद्यकीय सहाय्य घेऊन युएईचे विमान काबुलमध्ये दाखल

वैद्यकीय सहाय्यकाबुल – अन्न आणि वैद्यकीय सहाय्याचा समावेश असलेले युएईचे विमान शुक्रवारी अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर दाखल झाले. अफगाणी जनतेच्या मुलभूत आणि आवश्‍यक गरजा भागविण्यासाठी हे सहाय्य पुरविल्याचे युएईने जाहीर केले. युएईचे वरिष्ठ नेते लवकरच अफगाणिस्तानात दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

वैद्यकीय सहाय्य

अमेरिकेने सैन्यमाघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानात दाखल झालेले हे पहिलेच परदेशी विमान ठरते. दोन दशकांपूर्वी युएई आणि तालिबानमध्ये राजनैतिक सहकार्य होते. पण 9/11च्या हल्ल्यानंतर युएईने तालिबानबरोबरच्या सहकार्यातून माघार घेतली होती. तर आत्ताही तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर युएई तसेच सौदी अरेबियाने प्रतिक्रिया मांडण्याचे टाळले होते.

दरम्यान, अफगाणिस्तान सोडलेले शेकडो अफगाणींनी युएईमध्ये आश्रय घेतला असून शुक्रवारी क्राऊन प्रिन्स झाएद अल-नह्यान यांनी या निर्वासितांची भेट घेतली.

leave a reply