युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम म्हणजे ‘मिडल-अर्थ’ची लढाई नाही

- युक्रेनच्या वरिष्ठ सल्लागारांचा दावा

किव्ह – ‘सध्या रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष म्हणजे हॉलिवूडचा चित्रपट नाही. ज्यावेळी युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेबाबत बोलले जाते त्यावेळी ही घटना रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल किंवा युक्रेनला काहीच मिळणार नाही, असे दावेही केले जातात. काही वेळेस एखाद्या हॉलिवूडपटाच्या कथानकाप्रमाणे मोहिमेचे चित्र रंगविले जाते. प्रतिहल्ल्यांची मोहीम म्हणजे मिडल-अर्थसाठी चाललेली मोठी लढाई आहे आणि गोंडोरची एक लढाई सगळे काही ठरवेल, असे म्हटले जाते. मात्र असे काहीही घडणार नाही’, या शब्दात युक्रेनचे वरिष्ठ सल्लागार मिखाईल पोडिलिआक यांनी प्रतिहल्ल्यांची मोहीम युद्धातील निर्णायक वळण नसेल याकडे लक्ष वेधले.

युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम म्हणजे ‘मिडल-अर्थ’ची लढाई नाही - युक्रेनच्या वरिष्ठ सल्लागारांचा दावागेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेनच्या ‘स्प्रिंग काऊंटरऑफेन्सिव्ह’च्या मुद्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी राजधानी किव्ह तसेच खाकिॅव्ह भागातून युक्रेनने रशियन सैन्याला माघार घ्यायला लावली होती. त्यापाठोपाठ रशियाने दक्षिणेतील खेर्सन शहरातूनही आपले सैन्य मागे घेतले होते. त्याच धर्तीवर युक्रेनी लष्कर रशियावर जोरदार हल्ले चढवून दक्षिण युक्रेनमधील भागांवर ताबा मिळवेल तसेच क्रिमिआ ताब्यात घेईल, असे दावे करण्यात येत आहेत.

याच ‘स्प्रिंग काऊंटरऑफेन्सिव्ह’चा मुद्दा पुढे करून युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळविला आहे. यात रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्रे, रॉकेटस्‌‍ व लढाऊ विमानांचाही समावेश आहे. अमेरिका व नाटो सदस्य देशांनी युक्रेनच्या हजारो जवानांना प्रशिक्षणही दिले आहे. नवा शस्त्रसाठा व प्रशिक्षित जवानांच्या सहाय्याने युक्रेन रशियाच्या ताब्यातील भागांवर हल्ले चढविणार असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे. युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम म्हणजे ‘मिडल-अर्थ’ची लढाई नाही - युक्रेनच्या वरिष्ठ सल्लागारांचा दावामे महिन्यात युक्रेनचे हे हल्ले सुरू होतील, अशी शक्यता पाश्चिमात्य देशांसह युक्रेन व रशियातील काही अधिकारी तसेच माध्यमांनी वर्तविली होती.

मात्र प्रत्यक्षात अजूनही युक्रेनचे नियोजित प्रतिहल्ले सुरू झाल्याचे समोर आलेले नाही. उलट सध्या रशियाविरोधात विविध भागांमध्ये सुरू असणाऱ्या लढायांनाच युक्रेनकडून प्रतिहल्ल्याचा हिस्सा असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियात करण्यात येणारे ड्रोन्सचे हल्ले तसेच बाखमत व दक्षिण युक्रेनमध्ये युक्रेनी तुकड्यांकडून रशियाची होणारी हानी प्रतिहल्लेच असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार असणाऱ्या पोडोलिआक यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

पोडोलिआक यांनी केलेला मिडल-अर्थ व गोंडोरचा उल्लेख ब्रिटीश लेखक जे.आर.आर. टोल्किन यांच्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज्‌‍’ या कादंबरी मालिकेत आढळतो. त्यात मिडल-अर्थसाठी झालेली लढाई निर्णायक युद्ध म्हणून रंगविण्यात आले आहे. युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम म्हणजे ‘मिडल-अर्थ’ची लढाई नाही - युक्रेनच्या वरिष्ठ सल्लागारांचा दावाकादंबरीत असे असले तरी प्रत्यक्षात युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम तशी नसेल, अशी जाणीव युक्रेनच्या वरिष्ठ सल्लागारांनी करून दिली. त्यामुळे रशिया तसेच युरोपातील विश्लेषकांकडून युक्रेनच्या मोहिमेबाबत व्यक्त करण्यात येणाऱ्या शंकांना दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

युक्रेनचे सल्लागार प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेबाबत वास्तवाची जाणीव करून देत असतानाच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी विरोधी वक्तव्य करून लक्ष वेधून घेतले आहे. ‘गेल्या १४ महिन्यात रशियाने ताब्यात घेतलेला भाग पुन्हा मिळविण्याची क्षमता युक्रेनकडे आहे. प्रतिहल्ले यशस्वी होण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे व प्रशिक्षण युक्रेनला देण्यात आले आहे. त्यांच्याकडे योग्य योजनाही आहेत’, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला.

हिंदी English

 

leave a reply