रशियावर प्रतिहल्ले चढविण्यासाठी युक्रेनकडे पुरेशी क्षमता नाही

- युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांचा दावा

किव्ह/वॉशिंग्टन – युक्रेनने रशियाविरोधात आखलेली प्रतिहल्ल्यांची मोहीम यशस्वी करून दाखविण्यासाठी लष्कराकडे पुरेशी क्षमता नसल्याचा दावा युक्रेनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. खार्किव्ह क्षेत्रातील युक्रेनी लष्कराचे प्रमुख असणारे ब्रिगेडिअर जनरल सर्जेई मेल्निक यांनी स्पेनच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हा दावा केला. त्याचवेळी गेल्या १४ महिन्यांच्या संघर्षात युक्रेनने आपले अनुभवी लष्करी अधिकारी व प्रशिक्षित जवानांच्या तुकड्या गमावल्याची जाणीवही करून दिली.

रशियावर प्रतिहल्ले चढविण्यासाठी युक्रेनकडे पुरेशी क्षमता नाही - युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांचा दावागेल्या काही आठवड्यांपासून युक्रेनची नियोजित प्रतिहल्ल्यांची मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील लीकमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला असून युक्रेन व पाश्चिमात्य देशांमधील मतभेदही समोर येत आहेत. अमेरिकेसह काही पाश्चिमात्य देशांनी युक्रेनने प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेची व्याप्ती व उद्देश मर्यादित ठेवावे, अशी भूमिका घेतली आहे. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व निकटवर्तिय क्रिमिआ ताब्यात घेतल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याची वक्तव्ये करीत
आहेत.

पेंटॅगॉन लीकमुळे युक्रेन लष्करी मोहिमेतील काही गोपनीय बाबी उघड झाल्याने प्रतिहल्ल्यांची मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येते. रशियावर प्रतिहल्ले चढविण्यासाठी युक्रेनकडे पुरेशी क्षमता नाही - युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांचा दावायुक्रेनच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी सध्या डोन्बास क्षेत्रात सुरू असलेल्या कारवाया प्रतिहल्ल्यांचाच भाग असल्याचा दावा करून वेगळ्या मोहिमेची शक्यता फेटाळली होती. तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील माध्यमांनी मे महिन्यात युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू होईल व त्याची सुरुवात दक्षिण युक्रेनमधील हल्ल्यांनी होईल, असे वृत्त प्रसिद्ध केले होते.

या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. जनरल सर्जेई मेल्निक लष्करातील वरिष्ठ व अनुभवी अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतात. ‘युक्रेनच्या लष्कराकडे मनुष्यबळ व शस्त्रसामुग्रीचा अभाव आहे. रशियावर प्रतिहल्ले चढविण्यासाठी युक्रेनकडे पुरेशी क्षमता नाही - युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांचा दावाअनुभवी, प्रशिक्षित व व्यावसायिक स्तरावरील अधिकारी तसेच जवान जखमी, जायबंदी व थकलेले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. सध्या आम्ही फारसा लष्करी अनुभव नसलेल्या जवानांवर अवलंबून आहोत’, असा दावा जनरल सर्जेई मेल्निक यांनी केला.

नियोजित प्रतिहल्ल्यांमध्ये यश मिळवायचे असेल तर युक्रेनला सध्या असलेल्या क्षमतेपेक्षा चार ते सहा पट मनुष्यबळ आणि त्याच प्रमाणात शस्त्रसामुग्रीची आवश्यकता आहे. तरच रशियन संरक्षणदलांनी उभारलेला बचाव तोडणे शक्य होईल, याकडे युक्रेनी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, अमेरिकी वर्तुळातून युक्रेनी राजवटीला नवा इशारा देण्यात आल्याचे वृत्त ‘पॉलिटिको’ या वेबसाईटने प्रसिद्ध केले आहे. प्रतिहल्ल्यांची मोहीम राबविताना अनेक भागांमध्ये लष्करी तुकड्या विभागल्या जाणार नाहीत, याकडे लक्ष ठेवा, अशी सूचना अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

leave a reply