लष्करी बळावर युक्रेन क्रिमिआ पुन्हा ताब्यात घेईल

- युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

military-strengthकिव्ह – रशिया युक्रेनमध्ये आगेकूच करीत असतानाच युक्रेनचे लष्कर रशियाच्या ताब्यात असलेला क्रिमिआ प्रांत पुन्हा ताब्यात घेईल, असा दावा राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला. त्याचवेळी युक्रेन रशियन आक्रमणाचा अखेरपर्यंत प्रतिकार करेल व कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशाराही दिला.

युक्रेनच्या 31व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात त्यांनी आपला देश सहा महिने रशियाला यशस्वी टक्कर देत असल्याची ग्वाही दिली. ‘आम्ही आमच्या मुठी आवळल्या आहेत व भविष्यासाठी संघर्ष करीत आहोत. रशियाकडे किती सैन्य आहे, याची आम्हाला पर्वा नाही. आम्हाला आमच्या भूभागाची काळजी आहे व त्यासाठी आम्ही अखेरपर्यंत लढत राहू’, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बजावले. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनचा पुनर्जन्म झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. युक्रेन भीतीने किंवा घाबरून वाटाघाटी करणार नाही, असेही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यावेळी म्हणाले.

leave a reply