‘युएन’ची इराणकडे खुलाशाची मागणी

‘युएन’न्यूयॉर्क – इराणच्या अणुकार्यक्रम तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत केल्या जाणाऱ्या आरोपांविषयी इराणने सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी केली. 2015 साली झालेल्या अणुकराराचे इराण पालन करीत नसल्याची तक्रार व टीका या करारात सहभागी असलेले अमेरिका तसेच युरोपिय देश करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या देशांनी संयुक्त निवेदनाद्वारे इराणला खडसावले होते. तर अमेरिकेने दोन वर्षांपूर्वीच या करारातून माघार घेतली होती. अणुकरारात सहभागी असलेल्या देशांनीच इराणविषयी अविश्‍वास दाखविल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी इराणकडे खुलासा मागितला आहे.

leave a reply