‘युपीआरएफ’ या अतिरेकी संघटनेचा प्रमुख आसाम पोलिसांबरोबरील चकमकीत ठार

गुवाहाटी – ‘युनायटेड पिपल्स रिव्होल्युशनरी फ्रंट’ (युपीआरएफ) या अतिरेकी संघटनेचा अध्यक्ष ‘मार्टिन ग्वाईट’ आसाम पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. गेल्या पाच वर्षांपासून मार्टिन पोलिसांपासून पळ काढत होता. या चकमकीदरम्यान आसाम पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला.

आसामच्या करबी अनलॉग जिल्ह्यात ‘युपीआरएफ’ ही अतिरेकी संघटना सक्रीय आहे.येथील सिंगासन हिल जंगलात ‘युपीआरएफ’चे काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती आसाम पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सोमवारी रात्री आसामच्या पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. पोलिसांना पाहताच ‘युपीआरएफ’च्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यानंतर जोरदार चकमक उडाली. मंगळवारी सकाळपर्यंत ही चकमक सुरु होती.

चकमक संपल्यानंतर पोलिसांनी जंगलात मार्टिनचा मृतदेह पोलिसांना आढळला. त्यांचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी ही माहिती दिली. या जंगलात आणखी अतिरेकी लपून बसल्याची शक्यता असल्यामुळे ही शोध मोहीम सुरु ठेवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लष्कर आणि पोलिसांच्च्या बेधडक कारवायांमुळे ईशान्य भारतातल्या बंडखोर संघटनांचे धाबे दणाणले आहेत.

leave a reply